Join us

Love In The Air! अजय देवगण झाला रोमँटिक, व्यक्त केले काजोलवरील प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 15:35 IST

अजयने एक खास व्हिडिओ शेअर करत काजोलवरील प्रेम व्यक्त केले आहे.

नव्वदच्या दशकातील चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. त्याकाळातील बऱ्याच जोड्या सुपरहिट ठरल्या होत्या. त्यातीलच एक जोडी म्हणजे अजय आणि काजोल. त्यांच्या प्यार तो होना ही था या चित्रपटाला नुकतेच 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने अजयने एक खास व्हिडिओ शेअर करत काजोलवरील प्रेम व्यक्त केले आहे.

अजय देवगणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले की, रिल आणि रियल लाईफची 22 वर्षे'. या व्हिडिओत 'प्यार तो होना ही था' मधली काही सीन पाहायला मिळत आहेत. त्यामागे या चित्रपटातले गाणे सुरू आहे. ट्विटरवरचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

1988 साली रिलीज झालेला प्यार तो होना ही था हा चित्रपट हॉलिवूड सिनेमा फ्रेंच किसचा रिमेक आहे. या चित्रपटादरम्यान अजय व काजोल एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी 24 फेब्रुवारी 1999 साली सात फेरे घेतले होते. लग्नानंतर देखील ते अनेकदा चित्रपटांत एकत्र झळकले आहेत. गेल्याच वर्षी 'तान्हाजी' चित्रपटात ते दोघे झळकले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अजय लवकरच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :अजय देवगणकाजोल