Join us

 मी याआधी कधीच असं पाहिलं नाही...! अभिनेता सूर्या ‘Jai Bhim’ला मिळालेल्या प्रेमानं भारावला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 10:29 AM

Jai Bhim : धमक्यांपेक्षा लोकांचं प्रेम, त्यांचा पाठींबा मोठा आहे आणि म्हणूनच चित्रपटाला लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सूर्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गेल्या 2 नोव्हेंबरला अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’  (Jai Bhim) हा चित्रपट सध्या जबरदस्त चर्चेत आहेत.  एका सत्य सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि लोकांनी अक्षरश: या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच चित्रपटाला मनापासून दाद दिली. त्याचवेळी या चित्रपटातील काही दृश्यांनी वादही ओढवून घेतला. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य अभिनेता सूर्याला  (Actor Suriya) धमकीही मिळतेय. यामुळे त्याच्या घराबाहेर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. अर्थात या धमक्यांपेक्षा लोकांचं प्रेम, त्यांचा पाठींबा मोठा आहे आणि म्हणूनच चित्रपटाला लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सूर्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सूर्याने ट्विटर वरून लोकांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये तो लिहितो,   ‘जय भीम’बद्दलचं हे प्रेम जबरदस्त आहे. मी याआधी कधीच असं पाहिलं नाही. तुम्ही सर्वांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल मी आपला किती आभारी आहे, हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. आमच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! 

काय आहे वाद...चित्रपटात प्रकाश राज एका व्यक्तीसोबत बोलत असतात मात्र समोरचा व्यक्ती त्यांच्याशी तमिळ ऐवजी हिंदी भाषेत बोलतो. ते ऐकून प्रकाश त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतात आणि त्या व्यक्तीला हिंदी ऐवजी तमिळ भाषेत बोलायला सांगतात. याच दृश्यावरून हिंदी भाषिक नाराज झाले आहेत. याशिवाय वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी अभिनेता सूर्या, ज्योतिका, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि  जय भीमचे दिग्दर्शक टीजे ग्नानवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यात, चित्रपटाच्या निर्मात्यांनी जनतेची माफी मागावी आणि मानहानिकारक म्हणण्यात आलेले सर्व दृश्य काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.नोटिसीत एका अशा दृष्याचे वर्णन करण्यात आले आहे, ज्यात अग्नि कुंड एका कॅलेंडरवर दिसत आहे. खरे तर, अग्नि कुंड हे वन्नियार समाजाचे प्रतिक आहे. निर्मत्यांनी हे कॅलेंडर जाणूनबुजून ठेवले होते. एवढेच नाही, तर राजकन्नूचा छळ करणाºया पोलिसाचे चरित्र हेतुपुरस्सर वन्नियार जातीशी संबंधित जाखविण्यात आले आहे, असा दावाही या नोटिसीत करण्यात आला आहे. 

लोकांचा पाठींबाएकीकडे चित्रपटातील दृश्ये वादात सापडली असताना दुसरीकडे  विविध क्षेत्रातील मान्यवर  जय भीम सिनेमा व टीमच्या पाठिंब्यासाठी पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावर  #WeStandWithSuriya असा हॅशटॅग चालवला जात आहे. #WeStandWithSuriya , #JaiBhim हे ट्रेण्ड सतत  टॉपवर ट्रेण्ड करत होते.  

टॅग्स :Tollywoodबॉलिवूडसिनेमा