Join us

‘लवयात्री’चा अभिनेता प्रतिक गांधी कोरोना पॉझिटीव्ह, पत्नी व भावालाही झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 17:14 IST

प्रतिक व त्याची पत्नी दोघेही घरीच क्वारंटाईन आहेत. तर त्याचा भाऊ पुनीत रूग्णालयात भरती आहे.

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले.

गेल्या काही दिवसांत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांना कोरोनाची लागण झाली. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन या बच्चन कुटुंबातील चौघांनाही कोरोनाचे ग्रासले. आता सलमान खान प्रॉडक्शनच्या ‘लवयात्री’ सिनेमात झळकलेला अभिनेता प्रतिक गांधी याला कोरोनाची लागण झाली आहे. प्रतिकची पत्नी भामिनी ओझा आणि त्याचा भाऊ पुनीत या दोघांनाही कोरोना झाला आहे.प्रतिकने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली. कोरोनाचे निदान झाल्यानंतर प्रतिक व त्याची पत्नी दोघेही घरीच क्वारंटाईन आहेत. तर त्याचा भाऊ पुनीत रूग्णालयात भरती आहे.

प्रतिकने गुजराती सिनेमांमध्येही काम केलेय. बे यार, रॉन्स साइड राू, लव नी भवाई अशा अनेक हिट सिनेमांमध्ये तो झळकला. हिंदीमध्ये त्याने ‘मित्रों’ व सलमान खानच्या ‘लवयात्री’मध्ये काम केले. प्रतिक लवकरच हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम 1992’ या सीरिजमध्ये दिसणार आहे.

हंसल मेहता यांनी प्रतिक लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. ‘लवकर बरा हो चॅम्पियन, आपल्या पॉझिटिव्हीटीने व्हायरला हरव,’ असे हंसल मेहता यांनी आपल्या tweetमध्ये लिहिले आहे.

गेल्या आठवड्यात बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. बच्चन कुटुंबातील चार सदस्यांसह अनुपम खेर यांची आई, भाऊ व वहिनीला कोरोनाची लागण झाली. टीव्ही अभिनेता पार्थ समाथान आणि अभिनेत्री श्रेनु पारिख हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले.

टॅग्स :लवरात्रिकोरोना वायरस बातम्या