Join us

तेरी यादें आती है...! गोव्याच्या बीचवरचा लकी अलीचा हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 17:34 IST

बॉलिवूडमध्ये अनेक जण खूप लोकप्रीय झालेत आणि मग अचानक दिसेनासे झालेत. या यादीतले एक नाव म्हणजे, गायक लकी अली.

ठळक मुद्देहृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती.

बॉलिवूडमध्ये अनेक जण खूप लोकप्रीय झालेत आणि मग अचानक दिसेनासे झालेत. या यादीतले एक नाव म्हणजे, गायक लकी अली. होय, लकी अलीची वेगळी ओळख देण्याचे कारण नाही. कारण लकी हा कॉमेडीचा बादशाह मेहमूदचा मुलगा आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. लकी एक गायक आहे तसाच एक चांगला अभिनेताही आहे. ‘कांटे’ या चित्रपटात त्याचा अभिनय आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण त्यानंतर लकी इंडस्ट्रीतून जणू गायब झाला.  सध्या लकी अलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

लकी अली चा हा व्हिडिओ गोव्याच्या Arambol Beach वरील आहे. अनेक तरूण-तरूणी लकी अली भोवती फेर धरून बसले आहेत आणि लकी अली गिटार हातात घेऊन आपल्याच तंद्रीत गातोय. ‘जाये तो...’अशी ओळ म्हणून तो थांबतो आणि यानंतर त्याला फेर धरून बसलेले सगळेजण पुढच्या ओळी गाताना दिसतात. लकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट होतोय. त्यांच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 4 लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अभिनेत्री नफीसा अली यांनी  हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही.   यशाच्या बाबतीत लकी भलेही अपयशी ठरला असेल पण लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत. मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. तिने लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन व लकीला दोन मुले झालीत. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनायापासूनही लकीला दोन मुले झालीत. पण तिच्यापासूनही लकी विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा आली. सन २०१० मध्ये लकी व आयशा लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा सहा वर्षांचा मुलगाही आहे. मिस ग्रेट ब्रिटन राहून चुकलेली आयशा मुंबईत मॉडेलिंग करते. शिवाय ती गिटार प्लेअरही आहे. आयशाने बेंगळुरूचा एक गिटार बँड ज्वॉईन केला आहे.

टॅग्स :लकी अली