‘मि. अ‍ॅण्ड मिसेस गुडइनफ’ लवकरच होणार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2016 02:08 AM2016-04-14T02:08:05+5:302016-04-13T19:08:05+5:30

आपली चुलबुली डिम्पल गर्ल प्रीति झिंटा जेन गुडइनफ याच्यासोबत लग्नगाठीत अडकली आणि जेनसोबत काही दिवस घालवल्यानंतर आयपीएलसाठी भारतातही परतली. ...

'M And Miss Goodwin 'will soon be seen | ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस गुडइनफ’ लवकरच होणार दर्शन

‘मि. अ‍ॅण्ड मिसेस गुडइनफ’ लवकरच होणार दर्शन

googlenewsNext

/>आपली चुलबुली डिम्पल गर्ल प्रीति झिंटा जेन गुडइनफ याच्यासोबत लग्नगाठीत अडकली आणि जेनसोबत काही दिवस घालवल्यानंतर आयपीएलसाठी भारतातही परतली. तिच्यासोबत जेन येणे अपेक्षित असताना प्रीति एकटीच भारतात आली. त्यामुळे अद्यापही प्रीतिच्या चाहत्यांना जेनचे दर्शन झालेले नाही. पण आता आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे जेनही प्रीतिच्या पाठोपाठ भारतात येणार आहे आणि प्रीतिसोबत आयपीएल टीम KXIP ला चीअर अप करताना दिसणार आहे. येत्या १७ एप्रिलला प्रीतिची टीम मैदानात उतरणार आहे. या सामन्याला प्रीति व जेन दोघेही मैदानात हजर राहणार आहेत. प्रीतिने आपल्या लग्नाबाबतच्या सगळ्या गोष्टी अद्यापही उघड केलेल्या नाही. तिच्या लग्नाचे फोटो एका मॅगझीनला चॅरिटीसाठी विकण्यात आल्याच्या बातम्या आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती नाही. अर्थात फोटो असो नसो पण आता जेन स्वत:च भारतात येतो म्हटल्यावर आपल्यासाठी ते ‘गुडइनफ’ ठरणार आहे. तेव्हा वेट अ‍ॅण्ड वॉच
 

Web Title: 'M And Miss Goodwin 'will soon be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.