Join us

मा. वसंतराव देशपांडेना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 6:29 AM

संजीव वेलणकर२ मे १९२० साली जन्मलेल्या वसंतराव देशपांडे यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. ...

संजीव वेलणकर२ मे १९२० साली जन्मलेल्या वसंतराव देशपांडे यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. स्वत:च्या कलागुणांनी आणि बौद्धिक ताकदीने डॉ. वसंतराव देशपांडे यांनी आपली खास गायनशैली विकसित केली होती. ऐकायला अतिशय वेगळी, तरतरीत आणि काही वेळा अचानकतेचा सुगंध असणारी ही गायकी आत्मसात करायला मात्र अतिशय अवघड होती. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मा. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले.

 
मा.वसंतराव देशपांडे यांची काही गाणी
सुरत पिया
घेई छंद मकरंद
या भवन 
तेजोनिधी लोह गोल
लागी करेजवा कट्यार
प्रेम सेवा शरण
सप्रेम नमस्कार
आवडती
लोकमत  सिनएक्स तर्फे मा. डॉ. वसंतराव देशपांडे यांना आदरांजली.