न्यूड पोज देऊन खळबळ उडवणारी सुपरमॉडेल मधु सप्रे हिचा आज (14 जुलै) वाढदिवस. 14 जुलै 1971 साली नागपुरात जन्मलेली मधु सप्रे तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जायची.
मॉडेल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणा-या मधुने 1992 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. पण मिस युनिव्हर्स स्पर्धेत एका उत्तराने तिला आपला मुकुट गमावावा लागला होता. ‘ तु देशाची पंतप्रधान बनलीस तर काय करशील? असा प्रश्न या स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये तिला विचारण्यात आला होता. यावर मला भारतात एक मोठे स्टेडियम बनवायला आवडेल असे उत्तर तिने दिले होते. भारतात खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदाने नाहीत, असे ती म्हणाली होती. या असामान्य उत्तरामुळेच मधुने मुकुट गमावला अशी चर्चा त्यावेळी झाली होती. अर्थात, मनापासून जे वाटले तेच उत्तर दिल्याने आपणास खंत नाही, असेही तिने म्हटले होते.
मधु सप्रेची एक जाहिरात चांगलीच वादग्रस्त ठरली होती. 1995 मध्ये एका शूज तयार करणाºया एका कंपनीने मधु व मिलिंद सोमण या दोघांना घेऊन एक न्यूड जाहिरात तयार केली होती. या जाहिरातीची गणती आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये होते. मधु आणि मिलिंद या जाहिरातीमध्ये न्यूड झाले होते. पायात बुट आणि गळ्यात अजगर असे हे फोटोशूट होते. या जाहिरातीवरून प्रचंड वाद झाला होता. मुंबई पोलिसांनी आॅगस्ट 1995 मध्ये मधु व मिलिंदविरोधात गुन्हाही दाखल केला होता. जाहिरातीत अजगराच्या वापरावरही टीका झाली होती. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्टअंतर्गत संबंधित जाहिरात कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला गेला होता. तब्बल 14 वर्षे हा खटला सुरु होता. अखेर 14 वर्षांनी मिलिंद व मधु दोघांनाही निर्दोष ठरवले गेले होते.
मधूने इटलीतील आयस्क्रिम बिझनेसमॅन जिआर मारियासह लग्न केले आणि आपल्या कुटुंबीयांसह इटलीत स्थायिक झाली. मात्र अधूनमधून भारतातील फॅशन शोज आणि पेज थ्री पार्टीजमध्ये दिसत असते. मधू आणि जिआन यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी नोव्हेंबर 2001मध्ये लग्न केले. 2012मध्ये मधूने मुलीला जन्म दिला.