Madhuri Dixit: सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे माधुरी दीक्षित. 'धकधक गर्ल'ची बॉलिवूडवरील मोहिनी आजही कायम आहे. आजही भल्याभल्यांना माधुरीच्या सौंदर्याची भुरळ पडते. नुकतंच माधुरी 'स्टार प्रवाह' वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात पोहचली होती. यावेळी ती एक खास साडी नेसून पोहचली होती. माधुरीला पाहताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
'स्टार प्रवाह' वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यासाठी माधुरी खास तयार झाली होती. मखमली सुंदर साडी नेसून माधुरी कार्यक्रमाला पोहचली. तिनं साडीवर सुंदर गोल्डन रंगाचे ब्लॉऊज परिधान केलं होतं. त्यावर तिने गळ्यात सुंदर मोत्यांचा हार घातला होता. त्यामुळं तिच्या सौंदर्यांत आणखी भर पडली. तिने नेसलेली ही साडी साधी सुधी नाहीतर लाखमोलाची आहे. तिच्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला तर धक्काच बसेल.
माधुरीच्या सौंदर्याला या मखमली साडीनं एक शाही आणि उत्कृष्ट लूक दिलाय. ही मखमली साडी श्यामल आणि भूमिका यांनी डिझाइन केली आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार या साडीची किंमत तब्बल १ लाख ८० हजार एवढी आहे. या साडीत नेहमीप्रमाणे तिचा क्लासिक लूक दिसत आहे. या साडीतील काही फोटो तिनं सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.
दरम्यान, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ ( Star Pravah Parivaar Awards 2025) येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. मालिकांमधले लोकप्रिय कलाकार या सोहळ्यात परफॉर्मन्स सुद्धा सादर करणार आहेत. प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्यावर्षीच्या Star Pravah Parivaar पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राची महामालिका 'ठरलं तर मग' ठरली होती. आता यंदा यामध्ये कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला 'स्टार प्रवाह' वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे.