एकेकाच्या फक्त नावावर सिनेमे हिट होतात. अर्थात अशी ताकद सर्वांकडेच नसते. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने मात्र ही कमाल करून दाखवली. तिच्या एकटीच्या नावावर अख्खा सिनेमा चालावा, इतकी ताकद तिने नक्कीच कमावली. याच माधुरीला कधीकाळी टीका पचवावी लागली, हे अनेकांच्या ध्यानीमनीही नसेल.
तिचा पहिला सिनेमा ‘अबोध’ 1984 साली प्रदर्शित झाला. पण पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला. यानंतर चार वर्षांनी ‘तेजाब’ (Tezaab) आला आणि या सिनेमानं माधुरी स्टार झाली. या चित्रपटातील 1,2,3 या गाण्यानं तर लोकांना वेड लावलं. अगदी यानंतर माधुरी जिथं कुठं जायची लोक तिला ‘मोहिनी’ नावानेच ओळखायचे. या चित्रपटानंतर तिने कधीच मागं वळून बघितलं नाही. पण त्याआधी तिलाही लोकांची टीका सहन करावी लागली होती.होय, खुद्द माधुरीने अनुपम खेर यांच्या ‘द अनुपम खेर शो’मध्ये याचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती, ‘माझे दोन सिनेमे फ्लॉप झाले होते आणि लोकांच्या निगेटीव्ह कमेंट्स मला ऐकू येत होत्या. अगदी मी हिरोईन मटेरियल नाही, मी खूप सडपातळ आहे, असे लोक म्हणत होते. मी ते ऐकून निराश झाले होते. पण ‘तेजाब’ हिट झाला आणि सगळं काही बदललं. लोकांची भाषा बदलली. आधी मी त्यांना सडपातळ दिसायची, ‘तेजाब’ हिट झाल्यावर तेच लोक मला ‘स्लीम’ म्हणू लागले. अरे ही खूप चांगलं काम करते, जबरदस्त डान्स करते, अशा शब्दांत लोक माझं कौतुक करू लागले.’
‘तेजाब’साठी माधुरी नव्हे मिनाक्षी होती पहिली पसंत‘तेजाब’ हा चित्रपटाला आज 33 वर्षे पूर्ण झालीत. मात्र तुम्हाला कदाचित माहिती नसावं की, ‘तेजाब’ या चित्रपटासाठी सुरुवातीला मीनाक्षी शेषाद्रीला साइन करण्यात आलं होतं. होय, ‘मोहिनी’ या पात्रासाठी दिग्दर्शकांनी पहिली पसंती मीनाक्षीला दिली होती. तिला साइनही करण्यात आलं होतं. परंतु कमी मानधन आणि डेट्स नसल्यानं तिनं या चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर हा चित्रपट माधुरीला मिळाला. कदाचित मीनाक्षीने चित्रपट साइन केला असता तर ‘तेजाब’मध्ये अनिल-मीनाक्षी ही जोडी बघावयास मिळाली असती.