Madhuri Dixit Buys New Car: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. कधी चित्रपटामुळे तर कधी सोशल मीडिया पोस्टमध्ये तिची चर्चा सुरू असते. आता माधुरी चर्चेत आहे ती तिच्या करोडो रूपयांच्या नव्या कारमुळे. माधुरी व तिचा पती श्रीराम नेने यांनी नवीकोरी कार खरेदी केली आहे. होय, माधुरीकडे आधीच अलिशान गाड्या आहेत. आता तिने Porsche 911 Turbo S ही अलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
माधुरी व तिचा पती श्रीराम नेने यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात दोघंही पोर्शमधून प्रवास करताना दिसत आहेत. या कारची किंमत अंदाजे ३.०८ कोटी रूपये आहे. माधुरीने खरेदी केलेली ही कार सर्वाधिक वेगवान गाड्यांपैकी एक आहे. या कारची टॉप स्पीड ३३० किमी प्रति तास आहे.
माधुरी अलीकडे मोजक्याच चित्रपटांत दिसते. पण असं असूनही ब्रँड प्रमोशन, जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट याद्वारे बक्कळ कमाई करते. मीडिया रिपोर्टनुसार, वर्षाला ती १२ कोटींची कमाई करते. माधुरीला लक्झरी गाड्यांची आवड आहे. तिच्याकडे रोल्स रॉयल, ऑडी, स्कोडा रॅपिड, इनोव्हा क्रिस्टा अशा गाड्या आहेत. मीडियानुसार, ती कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे २५० कोटींपेक्षा अधिकची प्रॉपर्टी आहे.
माधुरीने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. काही वर्षांपूर्वीच ती कुटुंबीयांसह भारतात परतली. भारतात परत आल्यावर माधुरी पुन्हा एकदा कलाविश्वात सक्रीय झाली.