धक धक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करुन बॉलिवूड गाजवलं. माधुरी ही ९०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होती. 'देवदास', 'हम आपके है कौन', 'साजन', 'कोयला', 'जमाई राजा', 'बेटा', 'खलनायक' हे माधुरीचे काही सुपरहिट सिनेमे आहेत. आजही माधुरी तिच्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
'डोला रे डोला' गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित
माधुरीचा पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. 'मिसेस देशपांडे' या सीरिजचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं. यानिमित्ताने wrap up पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत माधुरी दीक्षितचा मोहक अंदाज पाहायला मिळाला. या पार्टीसाठी माधुरीने खास स्कर्ट आणि टॉप असा वेस्टर्न लूक केला होता. माधुरी दीक्षितच्या 'देवदास' सिनेमातील 'डोला रे डोला' हे गाणं या पार्टीत वाजवलं गेलं. हे गाणं ऐकताच त्यावर डान्स करण्याचा मोह अभिनेत्रीला आवरता आला नाही.
माधुरीने या गाण्यावर ठेका धरत गाण्याच्या हुक स्टेप्स्ट केल्या. या पार्टीतील तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माधुरीचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. दरम्यान, 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजममध्ये माधुरी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. माधुरीने 'द फेम गेम' या सीरिजमधून २०२२ साली ओटीटीवर पदार्पण केलं होते. आता पुन्हा ती सीरिजमधून भेटीला येत असून आता ती सिरियल किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच माधुरी 'भुल भुलैय्या ३' या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने अंज्युलिका ही भूमिका साकारली होती.