जर ही घटना घडली नसती तर माधुरी दीक्षित श्रीराम नेनेची नाही तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची असती पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 04:13 PM2021-11-20T16:13:09+5:302021-11-20T16:16:17+5:30
माधुरी दीक्षितला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जायच्या.माधुरीचे फिल्मी करिअर वगळता अफेअरमुळेही ती चर्चेत राहिली.
आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली, बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने. माधुरीने गेली २ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. माधुरीला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जायच्या. माधुरीचे फिल्मी करिअर वगळता अफेअरमुळेही ती चर्चेत राहिली. संजय दत्तसोबत असलेले माधुरीचे अफेअर चांगलेच गाजले.
'साजन' 1991 मध्ये रिलीज झाला होता. 'खलनायक' 1993 मध्ये रिलीज झाला होता. 'खलनायक' सुपरहिट ठरला. संजय आणि माधुरीची जोडी ऑनस्क्रीन चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरली. 'खलनायक'च्या शूटिंगदरम्यान संजय दत्त आणि माधुरी दीक्षित दोघांमध्ये जवळीक वाढली होती.मात्र दोघांचे नाते त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हते.
संजय आणि माधुरी दोघांच्याही कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता, विशेष माधुरीसह जेव्हा संजयचे अफेअर सुरु होते. त्यावेळी संजय दत्त आधीच विवाहीत होता.दोघांनाही कुटुंबाने भेटण्यास नकार दिला होता तरी लपून छपून दोघांच्या भेटीगाठी सुरु होत्या. दरम्यान, 1993 मध्ये संजय दत्त एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला होता. बहीण प्रिया दत्तने संजय दत्तला फोन करून अशी बातमी दिली, ज्यामुळे संजय दत्त पासून अनेक नाती दूरावली गेली.
प्रिया दत्तने संजयला फोनवर सांगितले की, त्याच्यावर टाडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय दत्त घरी परतला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांऐवजी पोलिस विमानतळावर त्याची वाट पाहत होते. संजयच्या घरीही पोलीस त्याची वाट पाहात होते. त्याला अटक करण्यात आली. मग टाडा अंतर्गत गुन्हा नोंदवणे म्हणजे तुरुंगाच्या नावाखाली आयुष्यच पुर्ण जेलची हवा खाण्यात घालवण्यासारखे होते.
संजय दत्तच्या या अटकेने चित्रपटसृष्टीतही मोठा आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. संजयवरील या आरोपांनी माधुरी दीक्षितलाही मोठा धक्का बसला होता. माधुरीला वाटत होते की संजयने आपली 'बॅड बॉय' इमेज मागे टाकली आहे, पण अटकेने त्याला एका नव्या संकटात टाकले होते. तेव्हापासून माधुरी दीक्षितने केवळ संजय दत्तपासून कायमचीच दूर गेली.