माधुरी दीक्षितने सुरु केले करण जोहरच्या ड्रीम प्रोजेक्टचे शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 7:17 AM
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित स्टाटर करण जोहरचा मचअवेटेड चित्रपट कलंकच्या शूटिंगचा आज पाचवा दिवस आहे. धक-धक गर्ल माधुरीने ...
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित स्टाटर करण जोहरचा मचअवेटेड चित्रपट कलंकच्या शूटिंगचा आज पाचवा दिवस आहे. धक-धक गर्ल माधुरीने शूटिंगसुद्धा सुरु केले आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार माधुरीने या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले तसेच वरुण धवन आणि आलिया भट्टसोबत सुद्धा ती शूट करणार आहे. माधुरीचे जास्त सीन्स या दोघांसोबतच आहेत. या गोष्टीला माधुरी दीक्षितने सुद्धा कन्फर्म केले आहे की आजपासून ती कलंकचे शूट करण्यासाठी उत्साहित आहे. बकेट लिस्टनंतर ती दुसऱ्यांदा करण जोहरसोबत काम करते आहे. याआधी माधुरीने करण जोहरचा चित्रपट 'ये जवानी है दीवानी'मध्ये डान्स केला होता. कलंकच्या शूटिंगशिवाय माधुरी मराठी चित्रपट बकेट लिस्टच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट 25 मे रोजी रिलीज होणार आहे. बकेट लिस्ट या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी ती बाईक चालवायला सुद्धा शिकली आहे. याशिवाय माधुरी अनिल कपूरसोबत 'टोटल धमाल' चित्रपटात ही दिसणार आहे. 'टोटल धमाल' चित्रपटातून अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर एकत्र शूट करतायेत. ‘टोटल धमाल’ हा चित्रपट ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘धमाल’च्या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तुफान कॉमेडी बघावयास मिळाली. ALSO READ : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची सिजलिंग केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसणार ऑनस्क्रिन