Join us

माधुरीला फक्त 'ब्रा' मध्ये सीन करायला सांगितलं, तिने नकार देताच...दिग्दर्शक टीनू आनंदचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 13:25 IST

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या सिनेमात माधुरीने त्या सीनला दिला होता नकार

एखादा सिनेमा शूट करताना मागे अनेक घडामोडी घडत असतात. बरेच किस्से असतात जे नंतर समोर येतात. अमिताभ बच्चन यांना सिनेइंडस्ट्रीत चान्स देणारे दिग्दर्शक टीनू आनंद (Tinu Anand) यांनी नुकतंच एका मुलाखतीत 'शहेनशाह' आणि 'कालिया' सारख्या सिनेमांचे किस्से सांगितले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि माधुरी दीक्षित  (Madhuri Dixit) यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. टीनू आनंद यांनी दोघांना एका सिनेमासाठी साईनही केले मात्र शूटदरम्यान माधुरी आणि त्यांच्यात बिनसलं. त्यांनी तिला थेट सिनेमातूनच काढलं असा खुलासा टीनू आनंद यांनी केला.

रेडिओ शोला दिलेल्या मुलाखतीत टीनू आनंद म्हणाले, 'शिनाख्त सिनेमासाठी अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित एकत्र काम करणार होते. यातील एका शॉटमध्ये माधुरीला ब्रा घालून सीन द्यायचा होता. मी तशी तिला आधीच कल्पना दिली होती आणि तिने चित्रपटाला होकार दिला होता. सीन शूट करताना अमिताभ यांना गुंडांनी साखळीने बांधलेले असते. तर माधुरी समोर उभी असते. तेव्हा माधुरी म्हणते, तुम्ही साखळीने बांधलेल्या माणसावर हल्ला करताय तेही एका मुलीसमोर. यानंतर तिला ब्लाऊज काढून ब्रा मध्ये कॅमेऱ्यासमोर यावं लागणार होतं. मी तिला ब्रा तिच्या सोयीनुसार डिझाईन करायला सांगितले होते. तुला हवा तसा डिझाईन कर पण ते ब्रा च असलं पाहिजे ब्लाऊज नाही असं मी ठळकपणे सांगितलं.'

ते पुढे म्हणाले,'सीन शूट करण्याच्या आधी माधुरी व्हॅनमध्ये तयार होत होती. बराच वेळ झाला ती आली नाही म्हणून मी पाहायला गेलो. बघतो तर ती तयारच नव्हती झाली. विचारल्यावर ती म्हणाली की मी हा सीन नाही देऊ शकणार. मी म्हटलं तुला आधीच सांगितलं होतं. आता करावंच लागेल. तरी ती नाही म्हणाली. म्हणून मी तिला थेट पॅकअप करुन सिनेमा सोडायला सांगितलं.'

नंतर अमिताभ बच्चन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हणलं जर तिला अडचण होती तर तिने सिनेमाला होकार द्यायच्या आधीच सांगायला हवं होतं. मी नंतर लगेच दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु केलाच. पण माधुरीच्या सेक्रेटरीने सांगितलं की थोडं थांबा ती तयार होईल. मात्र नंतर टीनू आनंद आणि माधुरीने कधीच एकत्र काम केलं नाही.

टॅग्स :माधुरी दिक्षितअमिताभ बच्चनसिनेमा