Join us

कंगनाचा 'धाकड' संकटात? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 7:15 PM

सध्या कंगनाच्या फिल्म 'धाकड'ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा काही भाग मध्यप्रदेशातही शूट होणार आहे. 'धाकड'मधील एकूण अ‍ॅक्‍शन सिक्‍वेन्ससाठी तिने तब्बल 25 कोटी रुपये खर्च केले आहेत.

नवी दिल्ली - बॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) शेतकरी आंदोलनावर सातत्याने ट्वट करताना दिसत आहे. तिच्या याच ट्विट्समुळे तिचा आगामी चित्रपट 'धाकड' (Dhakad) संकटात सापडल्याचे दिसत आहे. तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विट्समुळे काँग्रेस (congress)  कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी, आपण या चित्रपटाचे शूटिंग मध्यप्रदेशात होऊ देणार नाही, अशी धमकी दिली आहे. (Madhya pradesh congress leaders threaten not allow kangana ranaut film dhakad shooting)

सध्या कंगनाच्या फिल्म 'धाकड'ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा काही भाग मध्यप्रदेशातही शूट होणार आहे. द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, 'मध्यप्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी धमकी दिली आहे, की बॉलिवुड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौतने शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवर माफी मागितली नाही,तर ते धाकड चित्रपटाचे शूटिंग होऊ देणार नाही. 

कंगना राणौतने शेअर केले 'धाकड'मधील अ‍ॅक्शन सीन, चित्रीकरणासाठी खर्च केले २५ कोटी

कंगना रणौत ही इंडस्ट्रीतील सर्वात बिनधास्त अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती देशाशी संबंधित असलेल्या अनेक मुद्द्यांवर सोशल मिडियावरून आपल्या कमेंट देताना दिसते. यामुळे ती यापूर्वीही आनेक वेळा वादातही सापडली आहे. 

कंगना रणौतवर शेतकऱ्यांसंदर्भात अपमानास्पद  शब्द वापरल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यावरून तिच्याविरोधात तक्रारही करण्यात आली आहे. तिने शेतकरी आंदोलनाला विरोध करत अनेक ट्विट केले आहेत. 

अखेर कंगना राणौतची ‘टिवटिव’ थांबणार! ट्विटरला रामराम ठोकत ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार शिफ्ट

'धाकड'मधील अ‍ॅक्‍शन सिक्‍वेन्ससाठी खर्च केले 25 कोटी -'धाकड' सिनेमातील अ‍ॅक्‍शन सीनच्या चित्रीकरणासाठी कंगनाने अमाप पैसे खर्च केले असल्याचे नुकतेच सांगितले आहे. एका सीनची तयारी दिवसभर सुरू होती आणि रात्री त्याचे शूटिंग होणार असल्याचे तिने सांगितले. एखादा दिग्दर्शक एखाद्या सीनसाठी एवढी मेहनत घेत असल्याचे आपण यापूर्वी कधी बघितले नव्हते. या एका सीनसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च झाले. 'धाकड'मधील एकूण अ‍ॅक्‍शन सिक्‍वेन्ससाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च झाल्याचे तिने सांगितले. 'धाकड'च्या आगोदर कंगनाने 'थलायवी'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. 

प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडकाँग्रेसमध्य प्रदेश