Mahakumbh Viral Girl Monalisa: महाकुंभमेळ्यात माळा विकण्यासाठी आलेली मोनिलिसा (Monalisa Viral Girl) सध्या चर्चेत आहे. सुंदर डोळे असलेल्या मोनालिसाचं नशिब चमकलंय. मोनालिसा आता थेट अभिनेत्री होणार आहे. चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांनी तिला त्यांच्या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेत्री साईन केलंय. मोनालिसा आणि तिच्या कुटुंबाने हा चित्रपट करण्यास होकारही दिला आहे.
बंजारा समाजातील मोनालिसा तिच्या डोळ्यांमुळे महाकुंभात खूप चर्चेत होती. मोनालिसाचे सौंदर्य पाहून अनेकजण भारावले. मोनालिसाचा साधेपणा पाहून सनोज मिश्रा यांनी तिला आपल्या सिनेमात कास्ट करण्याचा निर्णय घेतला. तिचा शोध घेत ते थेट मध्य प्रदेशातील महेश्वर येथे तिच्या घरी पोहचले आणि मोनालिसासह तिच्या कुटुंबाची भेट घेतली.
सनोज मिश्रा यांनी तिला 'द डायरी ऑफ मणिपूर' साठी मुख्य अभिनेत्री म्हणून घेतलं आहे. एका लष्करी जवानाच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. या चित्रपटाद्वारे बॉलिवूड स्टार राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित राव बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शूटिंग चालू होण्याआधी तीन महिने मुंबईत तिला अभिनयाचे धडे दिले जाणार आहेत.
सुमारे २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे शुटिंग फेब्रुवारीपासून सुरू होईल. सनोज मिश्रा यांनी 'राम जन्मभूमी', 'काशी ते काश्मीर', 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' असे अनेक चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण मणिपूरच्या इम्फाळ आणि इतर भागात, दिल्ली आणि लंडनमध्ये केले जाईल.