Join us

'महाराज' २२ देशांमध्ये ग्लोबल हिट, जुनैद खान म्हणतो, "हा सामूहिक विजय आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 17:48 IST

Maharaj Movie : सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित 'महाराज' चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २२ देशांमध्ये ग्लोबल नॉन-इंग्लिश टॉप टेन यादीत झळकला आहे.

सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित 'महाराज' चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २२ देशांमध्ये ग्लोबल नॉन-इंग्लिश टॉप टेन यादीत झळकला आहे. या चित्रपटातून जुनैद खानने पदार्पण केले आहे, तर जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातच ५.३ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत.

जुनैद खान म्हणाला की,"माझ्या पदार्पणासाठी लोकांनी दिलेले प्रेम, कौतुक आणि प्रतिक्रियासाठी मी आभारी आहे. मी माझे निर्माता YRF, माझे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा, जयदीप सर, शर्वरी, शालिनी आणि सर्व कास्ट आणि क्रू सदस्यांचे अभिनंदन करतो. हा आमचा सामूहिक विजय आहे. आम्ही एक विशेष चित्रपट तयार केला आहे ज्याला नेटफ्लिक्सने जगभरात नेले आहे आणि हा चित्रपट सर्वत्र प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे."

या यशानंतर, 'महाराज' चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या नॉन-इंग्लिश टॉप टेन यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. १८६२ च्या महाराज लिबेल केसवर आधारित या चित्रपटाने आपल्या प्रभावी कथा आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे, या अद्भुत सहकार्याची ताकद दाखवून दिली आहे. 'महाराज' नेटफ्लिक्सवर प्रसारीत झाला आहे.