महाराष्ट्रात सोमवारी मतदान झाले. यावेळी सामान्य नागरिकांसोबत बॉलिवूड सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शाहरूख खान, आमिर खान, रणवीर सिंग, माधुरी दीक्षित असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मतदानाच्या रांगेत उभे दिसले. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनीही मतदान केले. पण यादरम्यान पुन्हा एकदा त्यांच्यातील ‘अँग्री वूमन’चे दर्शन घडले. मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या जया बच्चन अचानक तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या.
झी न्यूजने याबद्दलचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, जया बच्चन मुंबईतील जुहूच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचल्या. सून ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन हे दोघेही त्यांच्यासोबत होते. मतदान केल्यानंतर जया बच्चन बाहेर आल्या आणि तशा मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्यावर भडकल्या. याचे कारण काय तर फोटो. होय, त्याअधिकाऱ्याने जया यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. मग काय, निवडणूक अधिकाऱ्यानेच फोटो काढण्याची विनंती केल्यावर जयांचा पारा चढला आणि त्या जाम भडकल्या.
जया बच्चन claustrophobic या आजाराने पीडित आहे. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. या आजाराने पीडित व्यक्ती अचानक गर्दी पाहून बेचैन होते. अनेकदा तिला राग येतो. गर्दीच्या ठिकाणी हे लोक अस्वस्थ होतात. श्वेताने सांगितल्या नुसार, गर्दी पाहिली की, जया अस्वस्थ होतात. कुणी धक्का दिलेला वा चुकूनही स्पर्श केलेले त्यांना सहन होत नाही. कॅमे-याचा प्रकाश डोळ्यांवर पडला तरी त्यांना त्रास होतो.