Join us  

Ladki Bahin Yojana: लोकप्रिय अभिनेत्रीकडून 'लाडकी बहीण' योजनेचे तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:36 AM

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे महिला वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे, आमदार, खासदार, सत्ताधारी आणि विरोधकाकंडूनही या योजनेवर भाष्य केलं जात आहे. सरकारच्या या योजनेचं अनेकांकडून कौतुकही केलं जात आहे आता, बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनंदेखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत सरकारचं तोंडभरून कौतुक केलंय.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ट्विट करत राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. तिनं लिहलं, "मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील 1.5 कोटींहून अधिक महिलांना आता दर महिन्याला आर्थिक हातभार लाभेल. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. ही एक आनंददायक गोष्ट आहे. महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे खूप खूप अभिनंदन!".

लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचे झाल्यास महिलांना दरमहा १५०० रुपये याप्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास १५ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. सध्या १ कोटी ५ लाख महिलांच्या बँक खात्यावर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पैसे जमा केले आहेत. तर ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही, म्हणजेच ३१ ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै व ऑगस्ट चे ३००० व सप्टेंबरचे १५०० असे मिळून एकूण ४५०० रुपये मिळतील.  त्यामुळे महिला वर्गात आनंद पाहायला मिळतोय. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीएकनाथ शिंदेमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसपैसामहिला