Join us

"पवित्र महाकाव्याभोवती हा सिनेमा बागडत राहतो अन्..."; 'सिंघम अगेन' पाहून पृथ्वीक प्रतापने लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 9:00 AM

पृथ्वीक प्रतापने रोहित शेट्टीचा सिंघम अगेन सिनेमा पाहून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (singham again)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने 'सिंघम अगेन' सिनेमा पाहून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. पृथ्वीकने सिंघम अगेनचा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनविषयी पोस्ट करुन लिहिलंय की, "काल सिंघम सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बॉलिवूड ने तयार केलेला mass entertainment cinema एंजॉय केला. लेखकांसाठी साधारण २-२.३० मिनिट वाजलेल्या टाळ्या आणि standing ovation, प्रेक्षकांच्या मनात काय आहे हे सांगत होत्या."

पृथ्वीक पुढे लिहितो, "लहानपणी सगळ्यांनीच दूरदर्शन वर रामायण पाहिलयं, अनेक वर्षे ते आपण वाचत आलोय, ऐकत आलोय, पाहत आलोय. त्यामुळे या महाकाव्याची संपूर्ण गोष्ट सगळ्यांना तोंडपाठ असणं स्वाभाविकच आहे. आणि याच पवित्र महाकाव्याभोवती सिंघम सिनेमा बागडत राहतो. सिनेमात फक्त ॲक्शन नाही तर कलियुगात सुद्धा श्री रामांची तत्व जपणारा एक नायक आहे जो आपल्याला ही श्री रामांचा मार्ग पत्करायला प्रवृत्त करत असतो. फक्त डायलॅागबाजी नाही तर नितीमत्तेचे संदेश आहेत. फक्त रंजन नाही तर एक दिशा आहे आयुष्य जगण्याची आणि हे सगळं कथेत, कथेभोवती गुंफण्याचं काम क्षितीज पटवर्धन याने केलेलं आहे."

पृथ्वीक पुढे सांगतो की, "सिनेमा इतक्या कमालीच्या वेगाने स्क्रीन वर आणि मनावर पकड घेतो की आपल्याला दाद द्यायला ही उसंत मिळत नाही. सिनेमाचा शेवट काय होणार आहे आपल्याला माहिती असतं पण तरीही तो पाहण्याची उत्सुकता कमी होतं नाही आणि इथेच हा सिनेमा मनं जिंकतो.धोनी सिनेमाच्या शेवटी MSD वर्ल्डकप विनिंग सिक्सर मारणार हे माहित असूनही उत्कंठा वाढते की नाही? अगदी तसंच सिंघम बाबतही होतं.त्यामुळे ज्यांना सिनेमे एंजॅाय करायला आवडतात त्यांनी हा सिनेमा OTT वर येण्याची वाट पाहू नका. सरळ तिकीटं बुक करा आणि सिनेमागृहात पाहा."

पृथ्वीक शेवटी लिहितो की, "ही पोस्ट लिहिण्याचं कारणं ह्या सिनेमाची कथा माझ्या one of the favourite writers क्षितीज पटवर्धन याने लिहीली आहे. ‘Cinema is a director’s medium’ हे जरी खरं असलं तरी ‘Cinema is writers message to society and a firm opinion of him’ हे अमान्य करून चालणार नाही.आणि हो चित्रपटसृष्टीची निर्मिती असो वा तिचं पुनरुत्थान करण्यासाठी ‘मराठी माणूस’ हवाचं."

टॅग्स :अजय देवगणरोहित शेट्टीमहाराष्ट्राची हास्य जत्रा