९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) सध्या चर्चेत आहे. 'फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाईव्ह्ज' मधून महीप कपूर लाईमलाईटमध्ये आली होती. नेटफ्लिक्सवरील या सीरिजमुळे महीप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह आणि नीलम यांना लोकप्रियता मिळाली. संजय कपूरने मला धोका दिला होता असा खुलासा नुकतंच महिप कपूरने केला आहे.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत महीप कपूर म्हणाली, "मला वाटतं लोक आऊट ऑफ द बॉक्स विचार करत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या जागी उभं राहून समजून घेऊ शकत नाहीत. सगळेच परफेक्ट नसतात. प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतात. काही हरकत नाही." यावर भावना पांडे म्हणाली, 'आणि तू त्यात कंफर्टेबल आहेस. ही प्रत्येकाची आवड आहे. प्रत्येकाने तेच केलं पाहिजे जे त्यांना योग्य वाटतं."
तसंच यावेळी महीप कपूर म्हणाली की संजय कपूरला लेक शनाया कपूरसाठी सतत भीती वाटत असते. ती म्हणाली, "संजय खूप स्ट्रीक्ट आहे. त्याने बऱ्याच मुलींना डेट केलं आहे. पण आता त्याला गोष्टींची जाणीव झाली आहे. म्हणूनच त्याला शनायाची खूप काळजी असते. मुलाबाबतीत तो एकदम ओके असतो पण गोष्ट शनायाची येते तेव्हा तो चिंतेत येतो. मला त्याला शांत करावं लागतं. त्याला वाटतं की जर कोणी मुलगा शनायासोबतही तेच करेल जे त्याने केलं तर काय होईल? तरी आता तो शांत झाला आहे."
संजय कपूर आणि महीप कपूर यांना शनाया आणि जहान ही मुलं आहेत. शनाया कपूर लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. त्याआधीच तिचा चाहतावर्ग तयार झाला आहे. शनाया ही सुहाना, अनन्या, जान्हवी यांची बेस्ट फ्रेंड आहे.