Join us  

SS Rajamouli यांच्या पुढच्या सिनेमात महेश बाबूसोबत रोमान्स करणार दीपिका पादुकोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 1:54 PM

RRRच्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षक एसएस राजामौली यांच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Deepika Padukone and Mahesh Babu Upcoming Film: RRR चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षक एसएस राजामौली यांच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, राजामौली यांनी त्यांच्या पुढच्या  प्रोजेक्टवरचं काम सुरू केलं आहं. दिग्दर्शकाच्या या पुढच्या प्रोजेक्टला SSMB29 (तात्पुरती) असं नाव देण्यात आलं आहे. राजामौली यांच्या नव्या प्रोजेक्टबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबूला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. आता या चित्रपटाबाबत एक अपडेट चर्चेत आहे.

दीपिका पादुकोणमहेश बाबूसोबत रोमान्स राजामौली यांच्या या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले जाऊ शकते. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या चित्रपटाच्या टीममध्ये दीपिकाला कास्ट करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दीपिकाला अप्रोच करण्यात आले आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

राजामौली यांच्या चित्रपटात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणला कास्ट करण्याची चर्चा खरी ठरली, तर दीपिका महेश बाबूसोबत रोमान्स करताना पहिल्यांदाच दिसणार आहे. याशिवाय दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या प्रोजेक्ट k या चित्रपटात दीपिका झळकणार आहे. या चित्रपटात बाहुबली फेम अभिनेता प्रभास दीपिकाच्या सोबत दिसणार आहे. बॉलिवूडनंतर आता दीपिका दाक्षिणात्य चित्रपटांवर आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यास सज्ज झाली आहे.

या चित्रपट प्रोजेक्ट संबंधित लेखक विजेंद्र प्रसाद यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगितलं केले होते. हा चित्रपट जंगल अ‍ॅडव्हेंचरवर आधारित आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. महेश बाबूंना या चित्रपटाबाबत विचारले असता ते म्हणाले की, या चित्रपटाबाबत काहीही बोलणे घाईचे आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणमहेश बाबू