अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) आज वाढदिवस साजरा करत आहे. ९० च्या दशकात तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 'मन','बॉम्बे','1942 अ लव्ह स्टोरी' अशा अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘क्रिमिनल’ चित्रपटात लीड हिरोईन होती मनीषा कोईराला (Manisha Koirala). तेलगू आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी हा चित्रपट बनत होता. मनीषा कोईरालासोबत नागार्जुन, राम्या कृष्णा हेही या सिनेमा होते. मुकेश भट (Mukesh Bhatt) यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला होता आणि महेश भट (Mahesh Bhatt) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. हिंदीत ‘क्रिमिनल’ या नावानं बनवलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेकर्सनी तगडी प्लानिंग केली होती. सिनेमाची गाणी आधीच मार्केटमध्ये आली होती.
4 ऑगस्ट 1995 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण या सिनेमाचं खूपच थंड प्रतिसाद मिळाला. भट कॅम्पला हा फार मोठा धक्का होता. अतिशय जोरात प्रमोशन करूनही देखील हा चित्रपट फ्लॉप होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. अशात त्यांनी एका फंडा वापरला. फंडा काय तर फेक न्यूजचा. ‘क्रिमिनल’ प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांनी मुंबईसह देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज झळकली. या बातमीने संपूर्ण देशात जणू भूकंप आला. त्यावेळी न्यूज चॅनलचा सुळसुळाट नव्हता. सोशल मीडिया, मोबाईलही नव्हता. त्यामुळे फक्त प्रिंट मीडिया ही बातमी उमटली.वर्तमानपत्रांनी चौकटीत बातमी छापली. खालच्या बाजूला अगदी बारीक अक्षरांमध्ये ‘जाहिरात’ असं लिहिलं होतं. पण त्याकडे फारसं लक्ष जाणार नव्हतंच. कारण बातमीच तशी होती. ‘मनिषा कोईरालाचा राहत्या घरी खून...,’ अशी ही बातमी होती. देशात सगळीकडे मनिषा कोइराला च्या मृत्यूची बातमी पसरली.
लोकांचाही या बातमीवर चटकन विश्वास बसला कारण, ‘बॉम्बे’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मनिषाला तशाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. तिने रीतसर पोलीस तक्रार करून संरक्षण मागून घेतलं होतं. त्यामुळे मनिषाच्या हत्येची बातमी अनेकांनी खरी मानली होती. मनिषाच्या घरचे फोन सतत खणखणू लागले. आपल्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रात बघून खुद्द मनिषालाही धक्का बसला. ही बातमी भट कॅम्पकडून जाहिरातीच्या स्वरूपात दिली गेली होती. पण काही काळातच ही बातमी खोटी आहे हे लोकांच्या लक्षात आलं. भट कॅम्पने केलेला बनाव लोकांच्या लक्षात आला. एकीकडे या फेक न्यूजमुळे भट कॅप्शनची इज्जत गेली आणि दुसरीकडे सिनेमाही आपटला...