Join us

महेश भट्ट म्हणतात,‘आलियालाही हवी अपयशाची जाणीव’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2016 6:24 AM

 अपयश ही यशाची पहिली पायरी असली तरीही प्रत्येकाच्या पदरी एकदा तरी अपयश यायलाच हवे. कारण व्यक्ती अपयशामुळे खुप काही ...

 अपयश ही यशाची पहिली पायरी असली तरीही प्रत्येकाच्या पदरी एकदा तरी अपयश यायलाच हवे. कारण व्यक्ती अपयशामुळे खुप काही शिकतो. हे शब्द आपण अनेकदा ऐकलेले असतात. पण, आपल्या मार्गात जेव्हा अपयश येते तेव्हाच आपल्याला त्याचे महत्त्व कळते.असेच विचार आहेत महेश भट्ट यांचे. त्यांना असे वाटते की, ‘आलियालाही अपयशाची जाणीव व्हावी. कारण, तिला आत्तापर्यंत हायवे, २ स्टेट्स, कपूर अ‍ॅण्ड सन्स, उडता पंजाब, शानदार या चित्रपटांमधून प्रचंड यश मिळाले आहे.मी नक्कीच तिचा अभिमानी बाप आहे. पण, एक चांगला दिग्दर्शक म्हणून मला असे वाटतेय की, एक कलाकार म्हणून तिच्या मार्गातही एकदा अपयश यावे जेणेकरून तिला त्या काळातून बरंच काही शिकायला मिळावे.’