Join us

मी औरंगजेबाला मिठी मारू शकत नाही...! महेश भट यांच्या ट्विटवर अशोक पंडित यांचे उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 2:20 PM

आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक महेश भट यांच्या एका ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानशी संबंधित हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देअशोक पंडित यांनी अलीकडे आलेला ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्र्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा प्रोड्यूस केला होता.

लोकसभा निवडणुकांची तारीख जशी जशी जवळ येतेय, तशी तशी देशातील राजकीय वातावरण तापू लागलेय. राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा दणाणू लागल्या असतानाच सोशल मीडियावरही जोरात प्रचार सुरु आहे. ट्विट, रिट्विट, रिप्लाय अशा सगळ्यांना वेग आला आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. अशात आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक महेश भट यांच्या एका ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानशी संबंधित हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

‘आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखेच प्रेम करा,’ हेच ते महेश भट यांनी केलेले ट्विट. महेश भट यांनी एका व्हिडीओसोबत हे ट्विट पोस्ट केले आणि सध्याच्या राजकीय धुराड्यात या ट्विटवर जोरात चर्चा सुरु झाली. बॉलिवूडचे निर्माते अशोक पंडित यांना महेश भट यांचे हे ट्विटजराही रूचले नाही. मग काय, त्यांनी थेट त्यावर प्रतिक्रिया नोंदवली. ‘मी औरंगजेबाला प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही,’असे त्यांनी लिहिले.

सर, आम्ही अनेक वर्षांपासून हेच करण्याचा प्रयत्न करतोय. पण याबदल्यात आम्हाला मृत्यू, बलात्कार आणि बळजबरीने घर सोडावे लागले. दहशतवादाने बरबटलेल्या शेजाऱ्यावर कुणी कसे प्रेम करू शकते? जो आमच्या जिवावर उठलाय, त्याच्यावर कसे प्रेम केले जाऊ शकते? केवळ शेजारी आहात म्हणून तुम्ही प्रेमास पात्र ठरत नाही. मी औरंगजेबाला जवळ घेऊ शकत नाही, असे अशोक पंडित यांनी लिहिले.अशोक पंडित यांनी अलीकडे आलेला ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्र्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा प्रोड्यूस केला होता.

टॅग्स :महेश भट