महेश भट्ट सांगतायेत, या गोष्टीचा पूजा भट्टला झाला होता पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 11:22 AM
आशिकी या चित्रपटाला नुकतेच २७ वर्षं पूर्ण झाले आहेत. या चित्रपटात राहुल रॉय, अन्नू अग्रवाल आणि दिपक तिजोरी यांनी ...
आशिकी या चित्रपटाला नुकतेच २७ वर्षं पूर्ण झाले आहेत. या चित्रपटात राहुल रॉय, अन्नू अग्रवाल आणि दिपक तिजोरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. या चित्रपटातील राहुल रॉय आणि अन्नू अग्रवाल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटातील गाणी तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी आजही आशिकी या चित्रपटाची गाणी तितकीच हिट आहेत. आशिकी या चित्रपटात अन्नू अग्रवालने नायिकेची भूमिका साकारली असली तरी अन्नू या भूमिकेसाठी दिग्दर्शक महेश भट्ट यांची पहिली चॉईस नव्हती. या चित्रपटात त्यांची मुलगी पूजाने काम करावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी या चित्रपटाची कथा तिला ऐकवून तिला या चित्रपटात काम करण्यासाठी विचारले देखील होते. पूजा या भूमिकेसाठी योग्य असल्याचे महेश भट्ट यांचे म्हणणे होते. पूजाने डॅडी या चित्रपटात काम केले असल्याने तिला अभिनयक्षेत्रात तिचे करियर करायचे आहे असेच महेश भट्ट यांना वाटत होते. पण अभिनयक्षेत्रातील करियरबद्दल ती तितकीशी सिरियस नसल्याने तिने आशिकी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि तिची जागा अन्नू अग्रवालने घेतली. या चित्रपटात पूजाने काम केले नसले तरी तिने या चित्रपटासाठी पहिला क्लॅप दिला होता. त्याचवेळी महेश भट्ट यांना या चित्रपटासाठी नकार दिल्याचा पश्चाताप पूजाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला होता असे त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे.आशिकी या चित्रपटात पूजाने काम न केल्याचा तिला पश्चाताप झाल्याने तिने लगेचच त्याच वर्षी तिचे वडील महेश भट्ट यांच्यासोबत दिल है के मानता नही या चित्रपटात काम केले. Also Read : Comeback Film !! पूजा भट्ट पुन्हा बनणार ‘Alcoholic’!!