अभिनेता-दिग्दर्शक, लेखक, निर्माता अशी चौफेर कामगिरी करणारे महेश वामन मांजरेकर यांचा आज वाढदिवस. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपटसृष्टी, छोटा पडदा, बॉलिवूड अशा सर्वत्र आपली छाप पाडणारे महेश मांजरेकर हे एक अष्ठपैलू व्यक्तिमत्त्व. निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी आपली छाप सोडली. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोचा होस्ट म्हणूनही त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला. पण आज आम्ही महेश मांजरेकर यांच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
महेश मांजरेकर यांनी दोन लग्न केलीत. दोन्हीही प्रेमविवाह. शिवाय विवाहित असताना ते प्रेमातही पडले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते दीपा मेहता. त्यांना सत्या आणि अश्वमी अशी दोन मुले झालीत. पण या लग्नाची परिणीती घटस्फोटात झालीत. काही कारणांनी महेश आणि दीपा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
त्यांची दोन्ही मुले अश्वमी-सत्या सध्या महेश मांजरेकर यांच्यासोबतच राहतात. मांजरेकरांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता ‘क्वीन आॅफ हार्टस’ हा साड्यांचा ब्रँड चालवतात. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर लवकरच सलमान खानच्या ‘दबंग 3’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
दीपा यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर महेश मांजरेकर यांनी मेधा यांच्यासोबत लग्न केले. मेधा या अभिनेत्री आहेत. मांजरेकरांनी ‘आई’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात मांजरेकरांनी मेधाला संधी दिली.
मेधाला पाहताच ते तिच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. सई दिसायला फारच देखणी असून लवकरच ती अभिनेत्री म्हणून चित्रपटात डेब्यू करणार अशी चर्चा आहे. ‘काकस्पर्श’ या चित्रपटात मेधा यांच्यासोबत त्यांची मुलगी सई झळकली होती.
महेश मांजरेकर यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलांनीही चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या याने ‘एफयु’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. महेश मांजरेकर निर्मित या चित्रपटात ‘सैराट’ फेम आकाश ठोसरचीही मुख्य भूमिका होती. अर्थात या चित्रपटातला म्हणावे तसे यश लाभले नाही. त्यामुळे सत्या मांजरेकरला फार ओळख मिळू शकली नाही.
सलमान खानच्या ‘दबंग 3’मधून अश्वमी मांजरेकर बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. अश्वमीनंतर गौरीसुद्धा आपलं पदार्पण करण्यास तयार आहे मात्र, मराठी सिनेमातून. गौरीला मेहश मांजरेकर आपला आगामी सिनेमा ‘पांघरुण’मधून लाँच करणार आहेत.
अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्यासोबतच्या महेश मांजरेकरांच्या अफेअरच्या बातम्या एकेकाळी चर्चेत होत्या. 1999 मध्ये ‘वास्तव’च्या चित्रपटादरम्यान महेश व नम्रता एकमेकांजवळ आलेत, असे म्हटले जाते. पण हे नाते फार काळ चालले नाही. कारण महेश मांजरेकर विवाहित होते.