Join us

'तो कसा दिसतो बघ..'; 'वास्तव'साठी संजय नार्वेकरला होता विरोध; मांजरेकरांमुळे मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:57 PM

Mahesh majrekar: संजय नार्वेकरच्या उंचीमुळे त्याला नकार मिळत होता. मात्र, अभिनयातून त्याने स्वत:ला सिद्ध केलं.

बॉलिवूडच्या इतिहासात विशेष गाजलेला सिनेमा म्हणजे वास्तव. या सिनेमा अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकला होता. गुंडगिरीच्या राज्यात संपूर्ण कुटुंब, व्यक्ती कशाप्रकारे उद्धवस्त होतात याचं उत्तम उदाहरण या सिनेमातून दाखवण्यात आलं. संजयसह या सिनेमात काही मराठी कलाकारही झळकले होते. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे संजय नार्वेकर (sanjay narvekar). या सिनेमात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. मात्र, सुरुवातीला त्याला रिजेक्ट करण्यात आलं होतं. 

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या मंचावर दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर (mahesh majrekar) यांनी वास्तव संदर्भात एक किस्सा शेअर केला. यावेळी देडफुट्याच्या भूमिकेसाठी मी संजय नार्वेकरची पसंती केली होती. मात्र, सेटवर अनेकांनी त्याला नकार दिला होता.

मुंबई- मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणारे लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बॉलीवूडला असे काही चित्रपट दिले जे उत्कृष्टच्या यादीत मोजले जातात. त्यामुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये प्रचंड मान आहे. मात्र 'वास्तव' या चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला होता. या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी त्यांना इतरांचा विरोध सहन करावा लागला होता. खासकरून संजय नार्वेकर यांच्यासाठी. महेश यांनी चित्रपटातील देड फुट्या या पात्रासाठी संजय यांना कास्ट करायचं ठरवलं मात्र इतर संपूर्ण टीमने त्यांना ऐकवलं होतं. तरीही त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी संजय यांनाच कास्ट केलं आणि त्यांनी ते पात्र गाजवलं. ही सगळी माहिती स्वतः महेश मांजरेकर यांनी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात दिली आहे.

"मला बऱ्याचदा विचारलं जातं की मराठी कलाकारांनाच का कास्ट करतोस? तर, त्यामागे एक कारण आहे. मराठा कलाकार कामाप्रती एकनिष्ठ असतात. एखादं पात्र सहजपणे साकारु शकतील इतकी त्यांच्यात ताकद असते. परंतु, वास्तव सिनेमाच्या वेळी मी मला विरोध झाला होता. संजय दत्तसोबत जे देड फुट्या पात्र आहे त्यासाठी मी एका वेगळ्याच माणसाची निवड केली होती.पण तो ऐनवेळी आलाच नाही. त्यामुळे मी संजयची निवड केली. मी फोन करुन त्याला सेटवर बोलावलं. त्याला पाहिल्यावर माझ्या संपूर्ण टीमने मला विरोध करत त्याला घेऊ नका असं सांगितलं.  मी वारंवार तो कसा योग्य आहे हे सांगितलं. पण कोणी ऐकत नव्हतं", असं महेश मांजरेकर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "देड फुट्याच्या पात्रासाठी तो कसा योग्य नाही हे लोकांनी मला वारंवार सांगितलं. तो कसा दिसतोय, त्याची उंची बघ असं अनेकांनी सांगितलं. मात्र, तुम्ही एकदा त्याचं ऑडिशन घ्या, मग तुम्हाला कळेल मी त्याला का बोलावलंय ते. त्यानंतर संजयचं ऑडिशन घेण्यात आलं. त्याने त्यावेळी जो अभिनय केला तो पाहून सगळेजण थक्क झाले. त्यानंतर मी केलेली निवड योग्य होती. याची त्यांनी खात्री पटली. आणि, संजयने ते करुन दाखवलं. त्याची मेहनत फळाला आली. आजही तो लोकांमध्ये देड फुट्या याच नावाने लोकप्रिय आहे." 

टॅग्स :संजय नार्वेकरसेलिब्रिटीमहेश मांजरेकर संजय दत्तसिनेमा