सुशांत सिंग राजपूतने गेल्या रविवारी 14 जूनला आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापसमोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. सुशांतचा जवळचा मित्र महेश शेट्टीला सुशांतच्या अचानक निघून जाण्यामुळे दु:ख अनावर झाले आहे. सुशांतच्या आठवणीत भावूक पोस्ट महेशने लिहिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुशांतने शेवटचा कॉल महेशला केला होता मात्र दुदैर्वाने महेशने तो कॉल उचलला नव्हता.
महेशने आपल्या इन्स्टाग्रामवर सुशांतसोबतचा फोटो शेअर करत लिहितो, 'ही खूप विचित्र भावना आहे. मला बरेच काही सांगायचे आहे पण मी अजूनही नि:शब्द आहे. कधीकधी आयुष्यात, आपण एखाद्या व्यक्तिला भेटता आणि आपल्याला वाटते की आपण त्याला आयुष्यभर ओळखतो आहे. भाऊ व्हायला एकाच आईच्या उदरातून जन्म घ्यायला हवा असे नसते. आपली ओळख काहीशी अशीच झाली. शूटिंग दरम्यान फिल्मसिटीमध्ये एकत्र जेवण करणे आणि त्यानंतर लांब लचक फेरफटाका मारणे या गोष्टी कधी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक झाल्या कळलेच नाही.
'बर्याच आठवणी, आपले प्रवास, आपल्या न संपणाऱ्या गोष्टी, जेवण, चित्रपट, पुस्तके, निसर्ग, विज्ञान, नातेसंबंध आणि बरच काही. तो एका कँडीच्या दुकानात उभा असलेल्या मुलासारखा होता. जबरदस्त एनर्जी आणि कधीही न संपणारी स्वप्ने.
महेश पुढे लिहितो, , 'तो खूप परफेक्शनिस्ट होता, मी सुशांतचे सर्व चित्रपट बघायचे आणि खूप खुश होतो कारण एखादी भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायचा. त्याला पाहून आम्हाला सर्वांना अभिमान वाटायचा. मी असा विचार केला नाही की एक दिवस मी तुझ्यासाठी हे सगळे लिहिण्याची वेळ येईल. मला हे कुठेतरी माहिती होते की, देवाची तुझ्यावर कृपा आहे, परंतु तो तुला इतक्या लवकर बोलवून घेईल असे कधीही वाटले नाही. कदाचित तू तुझ्या वेदना मला सांगू शकाल असतास. तुला माहित होतं की शेट्टी तुझ्यासोबत नेहमी होता आणि नेहमीच तुझ्याबरोबर राहिल असता... मग का? एकदा बोलला असतास मित्रा..