भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कार्तिकी गोन्जाल्विस, बोमन आणि बेली, ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरी ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’च्या टीमची भेट घेतली. धोनीने ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स'च्या टीमला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी भेट दिली, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
टीम चेन्नई सुपर किंग्सने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी आणि CSK व्यवस्थापन चेपॉक स्टेडियमवर ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत. धोनीने त्याच्या नावाची जर्सी त्यांना भेट दिली. यादरम्यान धोनीची मुलगी जीवाही टीम द एलिफंट व्हिस्पर्सचे सदस्य कार्तिकी गोन्साल्विस, बोमन आणि बेली यांनाही भेटते.
या व्हिडिओमध्ये धोनी दिग्दर्शक कार्तिकसोबत ऑस्कर ट्रॉफीसोबत पोझ देताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या इंस्टाग्रामवर या कार्यक्रमाची काही फोटो देखील शेअर केली आहेत, ज्यामध्ये धोनी कार्तिकी गोन्जाल्विस, बोमन आणि बेली यांना CSKची जर्सी देताना दिसत आहे.
'द एलिफंट व्हिस्पर्स' ही खऱ्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म आहे. कार्तिकी गोंजाल्विस (Kartiki Gonsalves) यांनी दिग्दर्शित केली आहे. याची कहाणी बोमन आणि बेली यांच्या जीवनावर आधारित आहे. हे एक आदिवासी जोडपं आहे. आदिवासी पाड्यात राहणापे रघु आणि अम्मु या दोन हत्तींचं त्यांनी पालन केलं आणि त्यांना चांगलं जीवन दिलं. ४० मिनिटांच्या या फिल्ममध्ये मनुष्य आणि प्राण्यांमधील भावनिक, संवेदनशीलृ दृश्य दाखवण्यात आली आहे.सामान्य आयुष्य जगणारे बोमन आणि बेली यांचा प्राण्यांप्रती असलेले प्रेम आणि त्यांचा संघर्ष यावर फिल्म आधारित आहे.
तमिळनाडूच्या मुदाममल्लई नॅशनल पार्क मधील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या बोमन आणि बेली यांना २०१७ मध्ये एक जखमी हत्तीचे पिल्लू सापडले. या जोडप्याने त्या पिल्लाची काळजी घेतली. त्याला बरे केले. त्याचं नाव रघु ठेवले. यानंतर अजुन एक हत्ती त्यांच्यासोबत जोडला गेला. त्याचे नाव अम्मु ठेवण्यात आले. रघु मोठा झाल्यावर त्याच्या सुरक्षेसाठी त्याला एका योग्य माणसाकडे सोपवले. आता या फॅमिलीत केवळ बोमन, बेली आणि अम्मु राहिले आहेत जे आनंदात जगत आहेत आणि रघुला मिस करत आहेत.