Join us

​रणबीर कपूरसोबतच्या त्या फोटोंवर पुन्हा बोलली माहिरा खान! वाचा काय म्हणाली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 6:43 AM

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचे रणबीर कपूरसोबतचे ‘नको त्या स्थितीतील’(अहो, नको त्या स्थितीतील म्हणजे, रणबीरसोबत शॉर्ट कपड्यांत धुम्रपान करत ...

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचे रणबीर कपूरसोबतचे ‘नको त्या स्थितीतील’(अहो, नको त्या स्थितीतील म्हणजे, रणबीरसोबत शॉर्ट कपड्यांत धुम्रपान करत असतानचे) फोटो व्हायरल होऊन महिना उलटून गेलाय. पण अद्यापही या फोटोबद्दलच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. कालपरवा अभिनेता रणवीर सिंग याने या फोटोंवरून रणबीर व माहिरावर टीका करणा-यांना सुनावले होते. कुणालाही दुसºयाच्या आयुष्यात लुडबूड करण्याचा अधिकार नाही, असे रणवीर म्हणाला होता.रणवीरआधी माहिरा या संपूर्ण प्रकरणावर अगदी त्रोटक बोलताना दिसली होती. मला असल्या टीकेमुळे फार फरक पडत नाही, असे अप्रत्यक्षपणे तिने सुनावले होते. पण आता माहिरा पुन्हा या कॉन्टोव्हर्सीवर बोलली आहे. होय, एका ताज्या मुलाखतीत माहिरा या प्रकरणावर सविस्तर बोलली. ‘मी खरं तर खूप खंबीर स्त्री आहे. पण रणबीरसोबतचे ते फोटो लीक झाले तेव्हा मी मनातून हादरून गेले होते. अक्षरश: कोलमडले होते. आपण या फोटोंवर खुलासा करावा, असे मला रोज वाटे. पण मग मी स्वत:ला थांबवायची. कारण कुण्या शब्दांत आपले म्हणणे मांडायचे, तेच मला कळत नव्हते. लोक माझ्या या फोटोंमुळे नाराज होते. मी ट्रोल करणा-यांबदद्ल बोलत नाहीय. पण काही लोक खरोखरंच नाराज होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर या नाराजीमागचे कारण मला कळत होते. माझे ते फोटो पाहून माझी नानी वा मामूला जे वाटले असते, ते त्यांना वाटतं होते. त्यामुळेच अलीकडे एका वयस्कर महिलेने माझ्या त्या फोटोंबद्दल नाराजी व्यक्त केल्यावर मी ताबडतोब तिला माफी मागितली, ’असे माहिरा म्हणाली.ALSO READ: रणबीर कपूरसोबतच्या ‘त्या’ फोटोंवर काय म्हणाली माहिरा खान?मला लोक विचारतात की, मी माझ्या चाहत्यांसाठी आदर्श असू शकते का? मी यावर ‘हो’ असे उत्तर देते. होय, मी ‘रोल मॉडेल’ आहे. पण मी परफेक्ट रोल मॉडेल नाहीय. कारण मी मनुष्यप्राणी आहे आणि त्यामुळेच माझ्या हातूनही चुका होणार आहेत. त्या फोटोंमुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली. पण तेवढ्याच लोकांनी मला पाठींबाही दिला. पाकिस्तान बदलत आहे, हेच यावरून दिसते, असेही ती म्हणाली.