माहिरा खान अद्यापही विसरू शकली नाही तो अपमान!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 4:55 AM
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान गतवर्षी भलतीच चर्चेत होती. तिची चर्चा होण्यामागे कारण होते, बॉलिवूड. होय, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतचे ...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान गतवर्षी भलतीच चर्चेत होती. तिची चर्चा होण्यामागे कारण होते, बॉलिवूड. होय, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतचे स्मोकिंग करतानाचे तिचे फोटो लीक झाले होते. या फोटोंमुळे माहिरा व रणबीरच्या रिलेशनशिपची चर्चाही रंगली होती. साहजिकच पाकिस्तानात यामुळे जणू वादळ उठले होते. अद्यापही हे वादळ शमलेले नाही. होय, माहिरा एका ताज्या मुलाखतीत जे काही बोलली, त्यावरून तरी तेच दिसतेय. या मुलाखतीत माहिरा रणबीरसोबतच्या ‘त्या’ फोटोंवर बोलली. यानंतर तिला ज्या पद्धतीने ट्रोल केले गेले, त्यावरही बोलली. ‘त्या फोटोंवरून मला प्रचंड ट्रोल केले गेले. आजही ते सगळे आठवले की, मला अपमानित वाटते. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये असे पहिल्यांदाच घडले होते. ही माझ्या आयुष्यातील सगळ्यातील विचित्र स्थिती होती. खासगी आयुष्यातील क्षण, त्याचे फोटो असे चव्हाट्यावर येत असतील तर कुणालाही अपमानास्पद वाटेल. पाकिस्तानचे लोक माझा आदर करतात. माझे असे फोटो पाहून त्यांना राग येणे साहजिकही होते,’असे माहिरा म्हणाली. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, रणबीर संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये गेला असतानाचे हे फोटो होते. त्या दिवसांत माहिराही न्यूयॉर्कमध्ये होती. माहिरा ज्या हॉटेलात थांबली होती, तिथे रणबीर तिला भेटायला गेला होता. ते दोघेही हॉटेलाबाहेर वेळ घालवत असताना त्यांचे फोटो कुणीतरी कॅमेºयात कैद केले होते. इंटरनेटवर हे फोटो आग पसरावी तसे व्हायरल झाले होते.ALSO READ : video : स्टेजवर बळजबरीने किस करू लागला सहअभिनेता! पाहा, माहिरा खानने कसा सोडवला पिच्छा!!या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही कॅमेºयाने टिपले होते. हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरचे हे ‘लव्ह बाईट्स’ यानंतर जितका काय तो बोभाटाही झाला होता. पाकिस्तानी जनतेने तर माहिराला जाम फैलावर घेतले होते. ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्या होत्या.