माहिरा खानचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; ती म्हणते,‘ बॉलिवूडपासून कुणाला मिळेल प्रेरणा?’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2016 1:20 PM
दिग्दर्शक राहुल ढोलकिया याचा आगामी चित्रपट ‘रईस’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यामुळे चित्रपटाला वादग्रस्त ...
दिग्दर्शक राहुल ढोलकिया याचा आगामी चित्रपट ‘रईस’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यामुळे चित्रपटाला वादग्रस्त वलय निर्माण झालेय. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडविषयी तिने केलेल्या विधानाला सोशल मीडियावर प्रचंड विरोध करण्यात येतोय. २०११ मध्ये पाकिस्तानी कॉमेडियन ओमर शरीफ हे माहिरा खानची मुलाखत घेतानाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते,‘ आपण भारतीयांकडून प्रेरित होऊ शकत नाही. बॉलिवूडपासून कुणाला मिळेल प्रेरणा? आपण काही बॉलिवूडमध्ये नाही.’ ‘रईस’ २५ जानेवारीला प्रदर्शित होत असल्याने ही क्लिप पाहूनच चित्रपट पाहायला जायचे की नाही? याचा विचार करा. देशभक्त असाल तर तुम्ही जाणार नाही, असा सल्लाही टिवटरवरून देण्यात येत आहे. मध्यंतरी ‘उरी’ येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बरे होते. मात्र, या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण तयार झालं आणि पाकिस्तानी कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये विरोध होऊ लागला. आता हेच पाहा ना, ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या फवाद खानची भूमिका राजकीय पक्षांच्या विरोधामुळे चित्रपटातून वगळण्यात आली. आता माहिरा खानचा ‘रईस’ चित्रपटही बॅन करण्यात यावा अशी मागणी राजकीय पक्षांकडून लावून धरण्यात आली आहे. अशातच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्याने ‘रईस’च्या प्रदर्शनावरच टांगती तलवार आली आहे. ‘रईस’ हा चित्रपट १९८० च्या दशकातील गुजरातच्या पार्श्वभूमीवर आधारित असून यात एका दारू तस्कराचा व्यापार एक कठोर पोलीस अधिकारी उध्वस्त करण्याच्या विचारात असतो. या चित्रपटाची निर्मिती एक्सल एंटरटेनमेंट व रेड चिलीस एंटरटेनमेंट यांनी केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबतच नवाजुद्दीन सिद्दिकीची महत्त्वाची भूमिका आहे. }}}}