अभिनेत्री कंगना राणौतने ‘थलायवी’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ‘थलावी’ तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक आहे. यापूर्वी कंगनाचा सिनेमातील वेगवेगळे लूक ट्रेंड झाले होते. आता शूटिंगला सुरूवात झाल्यामुळे सेटवरील अनेक फोटोही व्हायरल होत आहेत. या सिनेमाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कंगनाच्या अभिनेत्री भाग्यश्री या सिनेमाच्या माध्यमातून २३ वर्षांनी कमबॅक करत आहे.
९० च्या दशकात अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. भाग्यश्रीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सबरोबर काम केले आहे. ज्यात सलमान खान, अक्षय कुमार या कलाकारांचा समावेश आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाने भाग्यश्रीला एका रात्रीत स्टार बनवले. मैने प्यार किया प्रदर्शित झाला तेव्हा भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती.
कंगणाचे सेटवरील फोटो समोर आल्यानंतर आता भाग्यश्रीचेही काही फोटो थलायवीच्या सेटवरून समोर आले आहेत. ट्रेडिशनल लुकमध्ये भाग्यश्री पाहायला मिळत आहे.या फोटोत तिने क्रिम रंगाची साडी परिधान केलेली आहे. या सिनेमासाठी ती प्रचंड उत्सुक असल्याचे पाहयला मिळतंय. चेह-यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतंय. हे फोटो पाहून भाग्यश्रीचे चाहतेही खुश झाले आहेत. या फोटोवर नेहमी्प्रमाणे लाईक्स आणि कमेंटस देत तिचे कौतुकही करत आहेत.'थलाइवी' सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. भाग्यश्री जयललिता यांच्या आई वेधा यांची भूमिका साकारणार आहे. कंगणासह तिचे खूप चांगले बॉन्डिंग क्रिएट झाले आहे. कंगणा ही उत्तम अभिनेत्री आहे. या सिनेमासाठी ती खूप मेहनत घेत आहे. तिच्यासह काम करण्यात एक वेगळाच आनंद मिळत आहे.
चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. कारण ज्या व्यक्तीवपील चित्रपट असतो त्याच्या प्रतिमेला धक्का लागू नये अशी प्रत्येकाची भावना असते.म्हणूनच या सिनेमाची टीमनेही कोणतीही कमी राहू नये यासाठी मेहनत घेत आहे.
Also Read: जयललिता यांच्या रूपात अशी दिसली कंगणा राणौत, पाहा तिचे एक से बढकर एक लूक
Also Read: आणि कंगना राणौतने बनली बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री