1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाने भाग्यश्रीला एका रात्रीत स्टार बनवले. मैने प्यार किया प्रदर्शित झाला तेव्हा भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती. भाग्यश्रीने सिनेमापूर्वी 'कच्ची धूप', 'होनी अनहोनी' आणि 'किस्से मियाँ बीबी के' या मालिकांमध्ये अभिनय केला होता. मात्र एकाच सिनेमातून भरघोस मिळालेले यश भाग्यश्री फार काळ टिकवू शकली नाही. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत भाग्यश्रीने यशस्वी करिअरवर पाणी सोडले. भाग्यश्रीने इतक्या लवकरच लग्न करत बॉलिवूडपासून दूर जाण्याचे कारण काय या मागे वेगवेगळे कारण आजही चर्चेत असतात.
भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, पती हिमालय दसानी तिच्यासाठी फारच पझेसिव आहेत. त्यातून होणारा ताणतणाव तिला नको असल्याने तिने बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. केवळ कुटुंबाकडे आणि मुलांकडे लक्ष द्यावे अशी सासरच्या मंडळींची अपेक्षा असल्याने भाग्यश्रीने घर सांभाळण्याचा निर्णय घेतला.
भाग्यश्री-हिमालय यांना दोन मुले आहेत. मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका. तर दुसरीकडे भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी एक अट ही ठेवली होती. अभिनेता म्हणून हिमालयलाही त्या सिनेमात घेतले जावे तरच ती त्या सिनेमात काम करेल. अशा अटीमुळे भाग्यश्रीचे यशस्वी करिअर पूर्णपणे संपले.भाग्यश्री आज बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरीही आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करते.
तसेच भाग्यश्रीचे मुलगी अवंतिका जास्त चर्चेत नसली तरीही सोशल मीडियावर तिचे फोटो लक्षवेधी ठरत आहेत. इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या इव्हेंट्सचे फोटो शेअर करुन ती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अवंतिकाने लंडनच्या कॅस बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे. एकीकडे तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होतेये तर दुसरीकडे ती वडीलांप्रमाणे बिझनेसमध्ये जाणार असेही बोलले जात आहे.