Join us

Maja Ma song Boom Padi : 55 वर्षांच्या माधुरीनं काय डान्स केलाय राव! पाहा, ‘मजा मा’चं फर्स्ट सॉन्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 4:22 PM

Madhuri Dixit, Maja Ma song Boom Padi out : 55 वर्षांची माधुरी ‘बुम पडी’ या गाण्यावर जबरदस्त थिरकली आहे. गाण्यातील तिची एक एक अदा हृदयाचा ठोका वाढवणारी आहे.

तमाम जनतेला आपल्या मोहक सौंदर्याने वेड लावणाऱ्या माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) बातच न्यारी. तर आता सर्वांची ही लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा ओटीटीवर कमबॅक करतेय. ‘मजा मा’ (Maja Ma) हा तिचा सिनेमा लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय. या चित्रपटातील माधुरीच्या फर्स्ट लुकने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं ऐकून तुम्हीही नवरात्रोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाल.55 वर्षांची माधुरी ‘बुम पडी’ (song Boom Padi) या गाण्यावर जबरदस्त थिरकली आहे. गाण्यातील तिची एक एक अदा हृदयाचा ठोका वाढवणारी आहे. यात ती दांडिया खेळताना दिसतेय. गाण्यातील माधुरीची एनर्जी पाहून चाहते थक्क आहेत. या गाण्यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत.

‘अ‍ॅण्ड क्वीन इज बॅक’, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. काय एनर्जेटिक परफॉर्मन्स आहे, मी तर प्रेमात पडलो, अशी कमेंट अन्य एका चाहत्याने दिली आहे. ही 55 वर्षांची आहे आणि एकही बीट तिने मिस केलेलं नाही, तिचा डान्स अद्भूत आहे, अशा शब्दांत एका चाहत्याने तिचं कौतुक केलं आहे. 

‘मजा मा’ या चित्रपटात माधुरी पहिल्यांदा गजराज राव यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ऋत्विक भौमिक, बरखा सिंह, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यात माधुरी एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 6 ऑक्टोबरला रिलीज होतोय. माधुरीने ‘फेम गेम’ या वेबसीरिजमधून ओटीटीवर डेब्यू केला होता. नेटफ्लिक्सवर रिलीज या सीरिजमध्ये ती संजय कपूरसोबत दिसली होती. त्याआधी माधुरी ‘कलंक’ या चित्रपटात झळकली होती. अर्थात तिचा हा मल्टिस्टारर सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता.

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूड