Join us

Major Trailer: शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत 'मेजर' चित्रपटचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 8:15 PM

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या जीवनावर आधारित मेजर (Major) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या जीवनावर आधारित मेजर (Major) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २६/११ हा काळा दिवस कोणीच विसरू शकणार नाही. मुंबईच  नाही तर संपूर्ण भारत देशाला या हल्ल्याने हादरवून सोडले होते. हे भीषण चित्र मेजर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते मेजर बनण्यापर्यंत आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करण्यापर्यंतची झलक पाहायला मिळते आहे.

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका अभिनेता आदिवी शेषने (Adivi Sesh) साकारली आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की मेजर संदीप यांच्या मनात बालपणापासूनच देशभक्तीची भावना होती आणि त्यांना नेहमी सैन्यामध्ये भरती व्हायचे होते. चित्रपटात केवळ मेजर यांचे देशावर असलेले प्रेम आणि तळमळ नाही तर एका सैनिकाचे वैयक्तिक आयुष्यही दाखवण्यात आले आहे. एक सैनिक मुलगा, पती असूनही पहिले प्राधान्य हे देशाला असते. आपला जीव गमवावा लागेल, ते कधीच परत येणार नाही, हे माहीत असतानाही आपल्या देशाचे शूर संदीप मेजर उन्नीकृष्णन यांनी केवळ लोकांच्या जीवाची काळजी घेतली होती.

दरम्यान, या चित्रपटात आदिव शेषासोबत शोभिता धूलिपाला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती एका भारतीय प्रवासी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.ती त्या रात्री दहशतवाद्यांच्या या भयानक हल्ल्यात हॉटेलमध्ये बळी पडते. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज या चित्रपटात मेजर संदीपच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर (Saiee Manjrekar) मेजर संदीप यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट ३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्ला