‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सर्वात अधिक चर्चा आहे ती, या चित्रपटाीतल ‘सेंट टेरेसा कॉलेज’ची. स्वप्नातले कॉलेज असे या कॉलेजचे वर्णन करता येईल. त्यामुळे टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया या तिन्ही स्टुडंटला या कॉलेजमध्ये पाहून तरूणाई हुरळली नसेल तर नवल.. हिरवेगार लॉन, प्रशस्त वर्ग अशा स्वप्नवत वाटणाऱ्या कॉलेजमध्ये सुंदर, ग्लॅमरस स्टुडंट. अशा कॉलेजमध्ये आपण एकदातरी जावे, असे अनेकांना वाटले नसेल तर नवल. पण तुम्हीही हा विचार करत असाल, जरा थांबा...होय, कारण ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’मधील हे कॉलेज तुम्ही शोधून शोधून थकणार,पण जगाच्या पाठीवर तुम्हाला ते कुठेही सापडणार नाही. कारण प्रत्यक्षात असे कुठले कॉलेज नाहीच. कारण चित्रपटातील हे कॉलेज प्रत्यक्षात कॉलेज नसून आहे एक सरकारी इमारत आहे. होय, ही इमारत आहे, डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची. सिनेमाच्या गरजेनुसार या इमारतीचा मेकओव्हर करण्यात आला.सिनेमाच्या प्रॉडक्शन डिझायनर सुमय्या शेख यांनी नुकताच हा गौप्यस्फोट केला. सेट डिझाईनर आणि आर्टिस्टनी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इमारतीला कॉलेजचा असा काही लूक दिला की, सगळेच त्याच्या प्रेमात पडले. त्यांनी या इन्स्टिट्यूचा अशाप्रकारे कायापालट केला गेला की हे ठिकाण भारतात आहे, हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही.फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटला कॉलेजचा लूक देण्याची प्रक्रिया अतिशय कठीण होती. अगदी कॉलेजचा गेट, बेन्चेस, इतकेच नव्हे तर याठिकाणच्या कॅफेतील कप हे सगळे डिझाईन करण्यात आले.‘स्टुडंट ऑफ द इयर 2’मध्ये दाखवलेल्या कॉलेजच्या बाहेरची सगळी दृश्ये ही याच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शूट केली गेली. अर्थात कॉलेजच्या आतल्या भागांना मुंबईच्या वेगवेगळ्या सेटवर शूट करण्यात आले.चित्रपटात दाखवलेला बॉस्केटबॉल कोर्ट, डान्स स्टुडिओ, क्लासरूम, प्रिन्सिपलचे कॉलेज आदींचे सेट बनण्यात आले. लायब्ररीचे दृश्य पुण्यातील फ्लेम विवेकानंद लायब्ररीत शूट केले गेले.कॅफेटेरिया मात्र फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उभारण्यात आले. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मोकळ्या जागेतील झाडांचा सुंदर व सुसंगत वापर करून त्याला कॅफेटेरियाचा लूक देण्यात आला.टायगरच्या घराचा शोध हेटीमसाठी आव्हान होते. यासाठी मसूरीतील एक स्पॉट निवडला गेला. याठिकाणी एका छतावर टायगरच्या घराचा सेट लावण्यात आला. त्याच्या खोलीतून सुंदर नैसर्गिक दृश्य दिसतील, असा हा सेट डिझाईन करण्यात आला.‘मुंबई दिल्ली दी कुडिया ’ या गाण्याच्या सेटसाठीही डिझायनर्सनी अपार मेहनत घेतली. एखाद्या लग्नाच्या सेटप्रमाणे दिसणा-या या गाण्यातील सेटचा आधीचा फोटो पाहिल्यावर यासाठी सेट डिझायनर्सनी किती मेहनत घेतली असावी,हे लक्षात येते.
(फोटो साभार -in.com)