Join us

​मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांची ‘पार्टी अंडर दी सेम रूफ’!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2017 9:46 AM

बॉलिवूडसाठी नाईट पार्ट्या नव्या नाही. यासाठी बॉलिवूडच्या मंडळींना कारणांचेही वावडे नाही. अगदी बर्थ डे पासून, सक्सेस पार्टी, फेस्टिवल पार्टी ...

बॉलिवूडसाठी नाईट पार्ट्या नव्या नाही. यासाठी बॉलिवूडच्या मंडळींना कारणांचेही वावडे नाही. अगदी बर्थ डे पासून, सक्सेस पार्टी, फेस्टिवल पार्टी काहीही असो, पार्टी झालीच म्हणून समजा.  बॉलिवूडचे काही खास चेहरे अशा पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावतात. या चेह-यांचा स्टाईलिश लूक, त्यांच्या मेकअपपासून त्यांच्या सूट-बुटापर्यंतची सगळ्यांचीच मग बातमी होते. काल मुंबईत अशीच एक पार्टी रंगली. या पार्टीला अनेकांनी हजेरी लावली. पण या पार्टीत काही चेहºयांनी कॅमेºयांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. होय, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हेच ते दोन चेहरे. दोघांनीही एका छताखाली पार्टी साजरी केली आणि त्याची बातमी झाली.आता अर्जुन व मलायकाच्या या पार्टीची बातमी का व्हावी?  अर्थातच यालाही कारणही तसेच आहे. मलायका पती अरबाज खान याच्यापासून विभक्त झाली, त्याला अर्जुन कपूर हे कारण असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती.मलायकाच्या अपार्टमेंटमध्ये अर्जुन अनेकदा स्पॉट झाल्याचेही कानावर आले. केवळ एवढेच नाही तर अर्जुन व मलायकाच्या अफेअरच्या चर्चांनी अर्जुनचे वडील बोनी कपूर जाम वैतागल्याचेही ऐकू आले. मलायकापासून दूर राहा, अशी तंबीच त्यांनी अर्जुनला दिल्याचे कळले. (पण कदाचित या तंबीचा फारसा फायदा झालेला तूर्तास तरी दिसत नाही. ) त्यामुळे काल मलायका व अर्जुनच्या ‘पार्टी अंडर दी सेम रूफ’कडे सगळ्यांचेच लक्ष गेले. यावेळी अर्जुन डेनिम आणि नेव्ही ब्ल्यू रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला तर मलायका लेअर्ड स्कर्ट आणि क्रॉप्ड टॉपमध्ये दिसली. हिरव्या गॉगलमध्ये तर मलायकाचे सौंदर्य आणखीच खुलून आले होते.