Join us

VIDEO : फोटो काढण्यासाठी जवळ आलेल्या फॅनवर भडकली मलायका, पण नंतर केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:48 IST

Malaika Arora Angry on Fan: मलायका कारमध्ये बसलेली असताना एक फॅन तिच्याजवळ फोटो काढण्यासाठी आला. त्याने आधी फोटो काढला असेल तरी तो पुन्हा तिच्यासोबत फोटो काढत होता.

Malaika Arora Angry on Fan: अभिनेत्री मलायका अरोराच्या अदांवर फॅन्स नेहमीच फिदा असतात. ती जेव्हाही घराबाहेर किंवा जिमबाहेर किंवा रेस्टॉरन्टबाहेर स्पॉट होते तेव्हा तिची एक  झलक मिळवण्यासाठी आणि तिच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी फॅन्स आतुर असतात. पण यावेळी एकाला तिच्यासोबत फोटो काढणं महागात पडलं आहे. मलायका कारमध्ये बसलेली असताना एक फॅन तिच्याजवळ फोटो काढण्यासाठी आला. त्याने आधी फोटो काढला असेल तरी तो पुन्हा तिच्यासोबत फोटो काढत होता. अर्थातच पुन्हा पुन्हा फोटो काढणाऱ्या फॅनवर ती रागावणार. तेच झालं. तिचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मलायका अरोरा जिमबाहेर स्पॉट झाली होती. ती घरी जाण्यासाठी कारमध्ये बसली. तेव्हाच तिचा एक फॅन आला आणि त्याला बघून ती थोडी भडकली. मलायका त्याच्यावर ओरडत म्हणाली की, - 'कितना फोटो लोगे? अभी तो लिया.' तिच्या बोलण्यावरून तर हेच वाटतंय की, तो तिच्यासोबत पुन्हा पुन्हा फोटो काढत होता. ज्यामुळे ती जरा रागावली. पण नंतर तिने फॅनला नाराज केलं नाही. तिने त्याला एक फोटो काढू दिला.

कारबाहेर मलायकाचे मित्र उभे होते ज्यांच्यासोबत ती बोलत होती. तेव्हाच हे सगळं घडलं. पण मलायकाने फॅनला नाराज केलं नाही. त्यानंतर ती सुद्धा हसू लागली होती. नंतर तिने कारचा दरवाजा बंद केला आणि तिथून निघून गेली.

ही काही पहिलीच वेळ नाहीये की, फॅनने आपल्या आवडत्या कलाकारासोबत फोटो काढताना असं काही केलं. याआधीही अनेकदा अनेक सेलिब्रिटींसोबत असं झालं आहे. त्यांचेही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूड