Join us

लक्झरी गाडीतून नव्हे तर ऑटोरिक्षातून मलायका पोहचली ख्रिसमस सेलिब्रेशनला, असा होता तिचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 10:28 AM

ख्रिसमस म्हणजे सण आनंदाचा... सण जल्लोषाचा... सा-या जगावर सुखांची उधळण करणारा आणि सांताक्लॉजच्या आगमनाने आसंमतामध्ये चैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे ख्रिसमस त्यामुळे आपले आवडते कलाकारही सेलिब्रेशन मुडमध्ये पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या हटके स्टाईलने सगळेच सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

सगळीकडेच ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू झाले आहे. त्यात  नववर्षाचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. थर्टी फर्स्ट सेलीब्रेशन म्हटलं की मौज मजा आणि उत्साहाला उधाण. तरुणाई बेधुंद होऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण नवीन वर्षाचे स्वागत आपआपल्या परीने साजरा करण्याचे प्लान्स ठरवून मोकळे झाले आहेत. त्यात आपले सेलिब्रेटी मंडळी तरी कसे मागे राहणार. त्यामुळे आपले आवडते कलाकारही सेलिब्रेशन मुडमध्ये पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या हटके स्टाईलने सगळेच सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

सध्या आपल्या हटके सेलिब्रेशन करताना दिसतेय मुन्नी अर्थात मलायका अरोरा खान.  मलायका अरोरा अलीकडेच मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोरिक्षातून फेरफटका मारताना दिसली. यावेळी तिची मैत्रीण एकता कॉल तिच्यासोबत होती. मलायका रविवारी रात्री ख्रिसमस पार्टीत पोहोचली होती. पार्टीतून परतत असताना तिने कारऐवजी ऑटोरिक्षाची निवड केली. विशेष म्हणजे मलायका बरोबर पार्टीत अर्जुन कपूर, अमृता अरोरा, रणवीर सिंह, जोया अख्तर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, तुषार कपूर यांनीही हजेरी लावली होती.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर