Join us

हे तर धक्कादायक...! कोरोना काळात कुंभमेळ्यातील गर्दी पाहून मलायका अरोरा 'शॉक्ड'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 5:11 PM

Malaika Arora On Kumbh Mela : सामाजिक, राजकीय मुद्यांवर मलायका अरोरा फार कमी व्यक्त होते. पण यावेळी मात्र ती कुंभमेळ्यातील गर्दीवर व्यक्त झाली आणि तिची पोस्ट लगेच व्हायरल झाली.

ठळक मुद्देयापूर्वी बॉलिवूडची अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही कुंभमेळ्यातील गर्दीवर अशीच प्रतिक्रिया दिली होती. ‘हा तर कोरोना पसरवणारा इव्हेंट,’ असे तिने म्हटले होते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) चर्चेत असते ती तिचे बोल्ड फोटो आणि अर्जुन कपूरसोबतचे तिचे रिलेशन. सामाजिक, राजकीय मुद्यांवर ती फार कमी व्यक्त होते. पण यावेळी मात्र ती कुंभमेळ्यातील गर्दीवर व्यक्त झाली आणि तिची पोस्ट लगेच व्हायरल झाली. (Malaika Arora On Kumbh Mela)इन्स्टास्टोरीवर पोस्ट शेअर करत मलायकाने कुंभमेळ्यातील (Kumbh Mela) तुफान गर्दीवर नाराजी व्यक्त केली आहे. उत्तराखंडातील हरिद्वार येथ सुरु असलेल्या  कुंभमेळ्यातील गर्दीने सगळे कोरोना नियम धाब्यावर बसवले आहेत. एकीकडे देशभर कोरोनाचा कहर सुरु असताना कुंभमेळ्यात मात्र लाखोंची गर्दी होताना दिसतेय. बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी अलीकडे सोशल मीडियावर या गर्दीवर टिप्पणी केली होती. आता मलायकानेही यासंदर्भात इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.

मलायकाने याच गर्दीचा एक फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. ‘कोरोना महामारी आहे... आणि हे धक्कादायक आहे,’ असे या फोटोवर तिने लिहिले आहे.  

अन्य एका इन्स्टा स्टोरीतही तिने कोरोनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘आपण घरात राहू तर सुरक्षित राहू. तुमच्या आजुबाजूच्या लोकांबद्दल क्षणभर विचार करा. नेहमी जिंकूच इतके शक्तिशाली आपण नक्कीच नाही,’ असे तिने म्हटले आहे.

यापूर्वी बॉलिवूडची अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही कुंभमेळ्यातील गर्दीवर अशीच प्रतिक्रिया दिली होती. ‘हा तर कोरोना पसरवणारा इव्हेंट,’ असे तिने म्हटले होते. यावरून अनेकांनी रिचाला ट्रोलही केले होते. हिंमत असेल तर रमझानबद्दल असेच ट्विट करून दाखव, अशा शब्दांत युजर्सनी तिला ट्रोल केले होते. यानंतर अभिनेता करण वाही यानेही अशाच आशयाची पोस्ट शेअर केली होती. विशेष म्हणजे, या पोस्टनंतर करणला जीवे मारण्याची धमकी देणारे मॅसेज मिळाले होते. त्याने या धमकीच्या मॅसेजचे स्क्रिनशॉट्सही शेअर केले होते.

टॅग्स :मलायका अरोराकुंभ मेळा