Join us

इन्स्टाग्रामवर केलेल्या 'या' बदलामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली मलायका अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 18:20 IST

अर्जून कपूर सोबत असलेले अफेअरला घेऊन सध्या मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आहे. मलायका अरबाज खानपासून २०१६ मध्ये वेगळी झाली आणि २०१७मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

ठळक मुद्दे मलायका व अर्जुनने आपल्या स्वप्नांचे घरही खरेदी केले आहेलवरकच हे कपल  लग्न करणार असेही मानले जात आहे.

अर्जून कपूर सोबत असलेले अफेअरला घेऊन सध्या मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आहे. मलायका अरबाज खानपासून २०१६ मध्ये वेगळी झाली आणि २०१७मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र त्यानंतर ही ती सोशल मीडियावर मलायका खान अरोरा असेच नाव लावत होती. मलायकाने आपल्या नावामागील 'खान' हे आडनाव काढले आहे.  मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फक्त मलायका अरोरा असे लिहिले आहे. 

 

 

नुकतेच मलायकाने सोशल मीडियावर या पेंडंटचा फोटो शेअर केला होता. या पेंडंटवर ‘एएम’ असे लिहिलेले असल्याने मलायकाच्या गळ्यातील हे पेंडंट लगेच चर्चेत आले.  या पेंडंटमधील ‘एम’ हे मलायकाच्या नावातील आद्याक्षर असून ‘ए’ हे अर्जुनच्या नावाचे आद्याक्षर असल्याचे म्हटले गेले. केवळ इतकेच नाही तर या पेंडंटद्वारे मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले, असेही मानले गेले. पण थांबा...मलायकाचे मानाल तर असे काहीही नाही. होय, या पेंडंटवर मलायकाने खुलासा केला आहे. मलायकाने केलेल्या खुलाशानुसार, हे पेंडंट प्रत्यक्षात ‘एम ए’ असे आहे. याचा अर्थ ‘मलायका अरोरा’ असा होतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत मिरर इमेज असल्याने ते ‘ए.एम.’ असे दिसले, इतकेच. 

लवरकच हे कपल  लग्न करणार असेही मानले जात आहे. मलायका व अर्जुनने आपल्या स्वप्नांचे घरही खरेदी केले आहे. मलायका व अर्जुनने मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. लग्नानंतर मलायका व अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे मानले जात आहेत.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानअर्जुन कपूर