Malaika Arora: मलायका अरोरा हे नाव कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. मलायका अरोरा जगभरात लोकप्रिय आहे. मलायका ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे .मलायका अरोरा कधी तिच्या फिटनेसमुळे, कधी हॉट लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण, आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. सध्या मलायका अरोराच्या टॅटूनं सर्वांचं लक्ष वेधून (Malaika Arora Flaunts Her New Tattoo) घेतलं आहे. मलायकानं तिच्या हातावर एक टॅटू गोंदवून घेतला आहे.
नुकतंच मलायकानं एक फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करत सर्वांना घायाळ केलं. यावेळी मलायकानं कॅटसूट परिधान केला होता. त्यावर तिनं एक जॅकेटही कॅरी केलं होतं. या लूकमध्ये ती प्रचंड हॉट दिसत होती. यावेळी तिनं कॅमेऱ्यासमोर जॅकेट काढलं, तेव्ह तिच्या हातावरचा टॅटू स्पष्ट दिसून आला. मलायकानं तिच्या हातावर "सब्र आणि शुक्र" गोंदवून घेतलं आहे. ज्याचा अर्थ संयम आणि कृतज्ञता बाळगणे असा होतो.
मलायकाला टॅटू काढायला आवडतात. याआधी तिनं कमरेवर उडत्या पक्षांचा टॅटू एक टॅटू गोंदवला होता. त्याचा अर्थ अर्थ पाखरांसारखं स्वच्छंद राहणं असा होतो. यासोबतचं मलायकाने तिच्या रिंग फिंगरवर Love लिहिलेला टॅटू आहे. हेच नाही तर तिच्या मनगटावरही एक टॅटू आहे. तिने मुलाची जन्म तारीख गोंदवून घेतलेली आहे.
दरम्यान, अलिकडेच चेन्नई-राजस्थान सामन्यादरम्यान मलायका अरोरा हिला एका दिग्गज क्रिकेटरसोबत स्पॉट करण्यात आलं. मलायका हिला ज्या क्रिकेटरसोबत स्पॉट करण्यात आलं आहे, तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नाही तर, श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा आहे. सध्या स्टेडियममधील दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो समोर आल्यामुळे मलायका आणि कुमार संगकारा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.