बॉलिवूडची मुन्नीची बातच न्यारी, जेव्हा जेव्हा ती मीडियाच्या कॅम-यांसमोर येते तेव्हा कॅमे-यात कैद होणा-या तिच्या प्रत्येक अदा या घायाळ करणा-या असतात. वयाची 40 ओलांडली असली तरी मलायकाचे सौंदर्य हे काही कमी होत नाही. दिवसें दिवस मलायका आपल्या सौंदर्याने सा-यांचे लक्ष वेधून घेते. आजच्या अभिनेत्रींनाही लाजवेल असे मलायकाचे सौंदर्य आजही सा-यांसाठी कौतुकाचा विषय ठरतो. नुकतेच मलायका स्पॉट झाली त्यावेळी गडद हिरव्या रंगाचा तिने ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये मलायकाची फिगर सा-यांचे आकर्षण ठरली. मलायकाचा हा हॉट अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मलायकाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला एक फोटो शेअर केला होता. मलायकाने या फोटो कॅप्शनसोबत मॅजिक लाइट, गर्ल्स गो देअर मुड्स, लव्ह माय गर्ल्स, कँडिड, नो मेकअप असे हॅशटॅग दिले आहेत. पण नो मेकअप या हॅशटॅगवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. कारण या फोटोत तिने मेकअप केला असल्याचे आपल्याला फोटो पाहाताच लक्षात येते. तिने डार्क लिपस्टिक लावली असून चेहऱ्याला देखील मेकअप केला होता.यावरून सोशल मीडियावर तिला चांगलेच सुनावण्यात आले होते.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळते. ते कधी डिनर डेटवर जातात तर कधी एकत्र चित्रपट पाहाताना दिसतात. अर्जुनच्या इंडियाज मोस्ट वाँटेड या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील मलायका आवर्जुन उपस्थित राहिली होती. यावेळी पहिल्यांदाच दोघांनी मीडियासमोर एकत्र पोझ दिली होती.