Join us

Malaika Arora छोट्या ड्रेसमुळे झाली ट्रोल, मग जेनिफर लोपेझ आणि रिहानासोबत केली स्वत:ची तुलना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:53 IST

Malaika Arora : मलायका अरोराने या पार्टीमध्ये शीअर एंब्रॉयडरीचा ड्रेस घातली होता. मलायकानुसार, लोक जेनिफर लोपेज आणि रिहानासारख्या हॉलिवूड स्टारचे अशाप्रकारचे कपडे पसंत करतात.

मलायका अरोरा (Malaika Arora) काही दिवसांपूर्वी रितेश सिधवानी होस्ट केलेल्या फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नाच्या पार्टीमध्ये गेली तेव्हा तिची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. करिना कपूर, करिश्मा कपूर आणि अमृतासोबत ती पोहोचली होती. त्यावेळी फारच सुंदर दिसत होती. पण तिच्या ड्रेसमुळे तिला फार ट्रोल करण्यात आलं होतं. ज्यावर आता मलायकाने उत्तर दिलं आहे.

मलायका अरोराने या पार्टीमध्ये शीअर एंब्रॉयडरीचा ड्रेस घातली होता. मलायकानुसार, लोक जेनिफर लोपेज आणि रिहानासारख्या हॉलिवूड स्टारचे अशाप्रकारचे कपडे पसंत करतात. पण जर इंडियन सेलिब्रिटींनी असे कपडे घातले तर त्यांना जज केलं जातं.

DNA च्या एका रिपोर्टनुसार, मलायकाने मुलाखतीत सांगितलं की, ती फक्त इतकंच ऐकू शकत होती की, ड्रेस शानदार दिसत आहे. ती म्हणाली की, लोक फार  पाखंडी आहे. तुम्ही रिहानाला बघणार, जेनिफरला बघणार किंवा बेयॉन्सेला बघणार आणि म्हणणार 'वाह'. माझंही त्यांच्यावर प्रेम आहे'. पुढे ती म्हणाली की, या सर्व त्या महिला आहेत ज्या तिला प्रेरित करतात. पण तेच काम जर मी केलं तर त्यांचं कौतुक करणारे म्हणतात 'तू हे काय करतेय?'. 

ती असंही म्हणाली की, 'जर इथले लोक दुसऱ्या कुणावर हा ड्रेस पाहून त्याचं कौतुक करू शकतात तर तेच लोक माझं कौतुक का करू शकत नाही आणि त्याकडे इंटरनॅशनल रूपाने का बघू शकत नाही? हो दुटप्पीपणा का?'. मलायका ट्रोल्समध्ये विश्वास ठेवत नाही. सोशल मीडियावर मिळालेल्या कमेंटमुळे त्रास होत असल्याचंही ती म्हणाली. 

टॅग्स :मलायका अरोरासोशल व्हायरलसोशल मीडिया