Join us

कोरोना झाल्यानंतर मलायका अरोराचे वाढले होते वजन, तिने सांगितले त्या काळातील समस्येबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 7:27 PM

आपल्या अदांमुळे सोशल मीडियावर चर्चेत येणारी अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा फोटोमुळे चर्चेत आली आहे.

आपल्या अदांमुळे सोशल मीडियावर चर्चेत येणारी अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा फोटोमुळे चर्चेत आली आहे. या फोटोत तिचा फिटनेस पाहून लोक तिचे कौतुक करत आहेत. मलायका अरोराने आपल्या टोन्ड बॉडीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. नुकताच तिने तिचा कोलाज फोटो सोशल मीडियावर शेअर केला. जो चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरणादायी आहे. या पोस्टमध्ये मलायकाने जिम वेअर घातले आहे आणि ती तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसते आहे.

या पोस्टमध्ये मलायकाने कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्ही खूप भाग्यशाली आहे. हे किती सोपे असेल. असे काही गेल्या काही दिवसांपासून ऐकते आहे. हो मी जीवनातील खूप गोष्टींसाठी आभारी आहे. पण नशीबाने यात खूप छोटी भूमिका निभावली आहे आणि राहिली गोष्टी सोपीची तर माझा मार्ग कधीच सोपा नव्हता. ५ सप्टेंबरला मला कोरोना झाला होता, जे खूप वाईट होते. ज्या व्यक्तींची कोरोनानंतर रिकव्हरी सोपी राहिली आहे त्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे.

जर माझ्या बद्दल बोलायचे झाले तर मी सहज हा शब्द अजिबात वापरणार नाही. त्याने मला शारिरीकरित्या तोडले. दोन पावले चालणेदेखील कोणत्या टास्कपेक्षा कमी नव्हते. फक्त अंथरुणातून उठून बसणे आणि खिडकीत उभे पाहणे हा एक प्रवास होता. माझे वजन वाढले, मला अशक्त वाटत होते माझी सहनशक्ती संपली होती. मी कुटुंबापासून दुरावली होती आणि बरेच काही घडले.

२६ सप्टेंबरला माझा कोरोनाची रिपोर्ट निगेटिव्ह आला, त्यासाठी मी खूप आभारी आहे. मला वाईट वाटत होते की माझे शरीर माझ्या मेंदूची साथ देत नव्हता. मला भीती होती की माझी ताकद कधी परत मिळणार नाही. मी विचार करत होती की मी चोवीस तासात कोणते एक काम पूर्ण करू शकेन की नाही.मलायका अरोराने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझे पहिले वर्कआउट खूप कठीण होते. मी काहीच चांगले करू शकले नाही. मला कोलमडून गेल्या सारखे वाटले. मात्र दुसऱ्या दिवशी मी उठून उभी राहिली आणि मी स्वतःला सांगितले की, मी करू शकते आणि मग तिसरा दिवस, चौथा दिवस आणि पाचवा. असे करत करत मी त्यातून बाहेर पडले.माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह यायला जवळपास ३२ आठवडे लागले आणि अखेर मला पुन्हा आधीसारखे वाटू लागले. मी आधीसारखा वर्कआउट करू लागले. शारिरीक आणि मानसिक असे मला मजबूत वाटते आहे.

चार अक्षरांचा शब्द ज्याने मला ताकद दिली. तो शब्द होता होप (HOPE). जेव्हा तुम्हाला वाटेल की, सर्व काही ठीक नाही तेव्हा आशा ठेवा की सर्व ठीक होईल. तुमच्या सर्वांचे आभार जे माझ्या संपर्कात राहिले. मला मदत केली. मी प्रार्थना करते की हे जग देखील लवकर बरे होईल आणि आपण सगळे या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू. दोन शब्दांनी मला या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदत केली. धैर्य आणि कृतज्ञता.

टॅग्स :मलायका अरोराकोरोना वायरस बातम्या