बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) बऱ्याचदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येते. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याची चर्चा होताना दिसते. मात्र, यावेळी मलायका तिच्या वयामुळे चर्चेत येत आहे. एखाद्या २० वर्षाच्या तरुणीलाही लाजवेल असा मलायकाचा फिटनेस आहे. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा होताना दिसते. मलायकाचा फिटनेस पाहून तिचं नेमकं वय किती याचा अंदाज लावणं कठीण होतं. मात्र, तिचं खरं वय समोर आलं आहे.
सध्या सोशल मीडिया मलायका आणि अरबाज यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साजिद खान मलायका आणि अरबाज (Arbaaz Khan) यांची मुलाखत घेत असून तिने तिचं खरं वय सांगितलं आहे.
The actual age of Malaika Arora.by u/hailyou2022 in BollyBlindsNGossip
'अरबाजपेक्षा तू २ वर्षांनी मोठी आहेस. तर, याविषयी तुला काय वाटतं', असा प्रश्न साजिदने मलायकाला विचारला. त्यावर, 'मला छान वाटतं', असं उत्तरं मलायकाने दिलं. तिचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी मलायकाच्या सध्याच्या वयावर चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विकीपीडियावर अरबाजचं सध्याचं वय ५५ दाखवलं आहे. त्यानुसार, मलायकाचं वय ५७ वर्ष असायला हवं. परंतु, विकीपीडियावर तिचं वय ४९ दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या तिच्या खऱ्या वयाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये.