Join us  

मलायका अरोराचा स्वीमिंग पूलमधील बोल्ड अंदाज, हॉटनेस बघून उडाली फॅन्सची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 10:09 AM

Malaika Arora Instagram: मलायका अरोरा या लेटेस्ट व्हिडिओत स्वीमिंग पूलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. पाण्यात भिजलेली मलायका सिल्व्हर कलरच्या शीर ड्रेसमध्ये कमालीची हॉट दिसत आहे.

Malaika Arora Instagram: मलायका अरोरा आपल्या बोल्ड लूकसाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यावेळी मलायकाचा असा अंदाज समोर आला आहे जो बघून तिच्या फॅन्सची झोप उडाली आहे. मलायका अरोराचा एक व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत मलायका ट्रान्सपरंट ड्रेस घालून स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. मलायका या भिजलेल्या ड्रेसमध्ये कॅमेरासाठी एकापेक्षा एक पोज देत आहे.

मलायका अरोरा या लेटेस्ट व्हिडिओत स्वीमिंग पूलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. पाण्यात भिजलेली मलायका सिल्व्हर कलरच्या शीर ड्रेसमध्ये कमालीची हॉट दिसत आहे. नक्कीच तिला बघून फॅन्सची झोप उडाली असणार. व्हिडिओ क्लीपमध्येच मलायकाच्या फोटोंचं एक कोलाज दाखवण्यात आलं आहे. ज्यात ती बोल्ड पोज देत आहे. 49 वयातही मलायका इतकी हॉट दिसत आहे की, तरूणी हिरोईनही लाजतील. 

मलायका अरोराच्या सिनेमात भलेही दिसत नसली तरी म्युझिक व्हिडीओ आणि फॅशनच्या विश्वात ती एक मोठं नाव आहे. काही सिनेमांमध्ये तिने आयटम नंबर केले होते. पण आता ती सिनेमात बऱ्याच काळापासून दिसली नाही. सध्या ती टेलिव्हिजनवरील वेगवेगळे रिअॅलिटी शोज जज करते. त्याशिवाय अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्येही दिसते. यातूनच ती मोठी कमाई करते. तसेच ती तिच्या पर्सनल लाइफमुळेही जास्त चर्चेत असते.

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूड