Join us

बाबो.. बाथरूममधून निघताना पँट घालायला विसरली होती मलायका अरोरा, शेअर केला मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 13:05 IST

मलायकाने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन मजेदार किस्से शेअर केले आहेत.

अभिनेत्री मलाइका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. मलायका अरोरा आपल्या फिटनेसला घेऊन खूप अर्लट असते. मलायका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी बोल्ड फोटोंमुळे नाही तर कोरोनाच्या भीतीमुळे. 

मलायकाने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन मजेदार किस्से शेअर केले आहेत. याध्ये तिने कोविड -19 ची लस घेतल्यानंतर घरी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना काय बोलते ते सांगितले आहे. मलायकाने लिहिले, 'जेव्हा पाहुणे घरी यायचे, तेव्हा मी त्यांना म्हणायचे, घाबरू नका, आमच्या कुत्र्याचं लसीकरण केले आहे. आता मी त्यांना सांगतो, घाबरू नका, आम्हीसुद्धा व्हॅक्सिनेशन घेतलं आहे. '

पँट घालायला विसरली मलायका याशिवाय मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक किस्सा शेअर करताना लिहिले की, 'मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेलो. मी कोपऱ्याने दरवाजा उघडला, मी पायाने टॉयलटची सीट उचलली.  मी टिश्शूच्या मदतीने पाण्याचा वापर केला, हात धुतले आणि मग बाथरूमचा दरवाजा कोपऱ्याने बंद केला आणि जेव्हा मी टेबलाकडे परत आलो तेव्हा मला कळले की मी पॅन्ट घालायला विसरले.'

गेल्या तीन वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करतायेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अगदी खुल्लमखुल्ला जगासमोर आपले नाते मान्य केले आणि तेव्हापासून दोघांच्याही प्रेमाला उधाण आले. प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी मलायका व अर्जुन सोडत नाहीत. लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात. 

टॅग्स :मलायका अरोरा